आगरकरांचा कार्यकाळ संपला अन् बीसीसीायने मोठा निर्णय घेतला, VVS Laxman वर टाकली मोठी जबाबदारी
BCCI Meeting: बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे पडसादही उमटायला आता सुरुवात झाली आहे,

BCCI Meeting: बीसीसआयने आतापर्यंत एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत निवड समितीच्या बैठकांना केवळ निवड समितीचे सदस्यच उपस्थित राहत असत, परंतु बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आतापासून, सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) प्रमुखदेखील निवड समितीच्या बैठकांना नियमितपणे उपस्थित राहणार आहेत. ही घोषणा स्वतः बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी केली आहे. याची सुरुवातही झाली आहे.
मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी घोषणा केली. सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण भविष्यातील सर्व वरिष्ठ निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहतील. टी-२० आंतरराष्ट्रीय आणि इंडिया ‘अ’ संघांच्या निवडीसाठी गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीतही ते उपस्थित होते. सैकिया यांनी पीटीआयला सांगितले, “आतापासून, निवड समितीचे सदस्य आणि सीओई यांच्यात संवादाचा कोणताही अभाव राहणार नाही याची खात्री करण्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण सर्व वरिष्ठ निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहतील.”
तुम्हाला आठवत असेल की, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात संवादाचा स्पष्ट अभाव होता. असे मानले जाते की, दुखापतग्रस्त खेळाडूंबाबत CoE कडून वेळेवर माहिती न तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंना संघात स्थान दिले गेले, ज्यामुळे नंतर बदल करावे लागले.
सैकीया म्हणाले, “मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत, CoE चे क्रिकेट प्रमुख म्हणून लक्ष्मण आतापासून सर्व बैठकांना उपस्थित राहतील, असा निर्णय घेण्यात आला. संवादातील दरी टाळणे आणि निवडकर्त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती पुरवणे, हा यामागील उद्देश आहे.” अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले की, निवडकर्त्यांनी निर्णय घेतले, परंतु खेळाडू उपलब्ध नव्हता, तसेच वरिष्ठ खेळाडूंबाबतची माहितीही अस्पष्ट होती. मोहम्मद शमीचे प्रकरण याचेच एक उदाहरण आहे.
जेव्हा अजित आगरकर मुख्य निवडकर्ता होते, तेव्हा त्यांनी एकदा सांगितले होते की त्यांच्याकडे शमीबाबतचा फिटनेस रिपोर्ट नाही. यामुळे शमी संतापला होता. तो तंदुरुस्त होता आणि CoE कडे ही माहिती होती, परंतु आगरकर आणि लक्ष्मण यांच्यात संवादाचा अभाव होता. यामुळे त्याची संघात निवड झाली नाही. असे पुन्हा घडू नये यासाठी बीसीसीआयने आता महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
