BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरापर्यंत कोरोनाची मजल

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. Sourav Ganguly Family members Corona test positive

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरापर्यंत कोरोनाची मजल

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सचिव स्नेहाशीष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. (Sourav Ganguly Family members Corona test positive)

स्नेहाशीष यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी स्नेहाशीष यांच्या सासू-सासऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चौघांनाही कोव्हिड 19 ची लक्षणे होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. यंदा आयपीएलचे सामने खेळवले जाणार की नाही याबाबत बराच खल सुरु होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलचे सामने भरलेच नाहीत. कोरोना संकट टळल्यानंतर पुन्हा क्रिकेट सामने सुरु होतील, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदी

जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नियुक्ती (Sourav ganguly new bcci president) झाली. रविवारी (13 ऑक्टोबर 2019) मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षपद निवडण्यासाठी बैठक (Sourav ganguly new bcci president) झाली होती.

या बैठकीवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि एन श्रीनिवास हे गट आमने-सामने होते. श्रीनिवासन गटाकडून ब्रजेश पटेल तर ठाकूर गटाकडून प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली यांचे नाव सुचवले जात होते. अखेर सर्व नाट्यमय घडामोडीनंतर सौरव गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

(Sourav Ganguly Family members Corona test positive)

संबंधित बातम्या  

संपत्तीतही ‘दादा’, सौरव गांगुलीची संपत्ती किती?

BCCI च्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *