BCCI: आशियाई क्रीडा स्पर्धासारखी मोठी स्पर्धा पण टीम इंडियाची चांगली सोयच होणार नाही…असं का? बीसीसीआयनं दिलं उत्तर
Asian Games 2026: क्रिकेटचा समावेश असलेले आशियाई खेळ जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर रोजी सुरू होतील. पण त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

- क्रिकेटचा समावेश असलेले आशियाई खेळ जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर रोजी सुरू होतील. आशियाई खेळांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघ सहभागी होतील आणि बीसीसीआयने त्यांचे संघ आधीच जाहीर केले आहेत.
- बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका निवेदनाद्वारे आशियाई खेळांसाठी खेळाडूंच्या हॉटेल व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या संभ्रमावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय संघाचे खेळाडू आयोजन समितीने दिलेल्या निवासस्थानांमध्येच राहतील. “
- “आयची-नागोयामध्ये दर्जेदार हॉटेल्सच्या अभावामुळे क्रिकेटपटूंच्या हॉटेलबाबत प्रश्न उपस्थित केले जात असले तरी, हॉटेलबाबत कोणतीही मोठी समस्या नाही आणि बीसीसीआय व खेळाडू सध्याच्या व्यवस्थेवर समाधानी आहेत.”
- बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, “ही निश्चितच पंचतारांकित हॉटेल नाही, पण ती चांगली आणि आरामदायक आहे. व्यवस्था केलेल्या हॉटेलचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही मागवले आहेत. खेळाडू तिथेच राहणार आहेत, कारण दुसरा पर्याय ओसाका किंवा टोकियोमध्ये राहण्याचा होता, जी ठिकाणे मैदानापासून खूप दूर आहेत.”
- भारतीय पुरुष क्रिकेट संघ २०२६ च्या आशियाई खेळांसाठी २० सप्टेंबर रोजी टोकियोला रवाना होईल, जिथे ते २२ सप्टेंबर रोजी जपानविरुद्ध एक ऐतिहासिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळतील.
Follow Us





