AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी BCCIचा मोठा निर्णय, जुन्या कोचची घरवापसी

भारतीय संघ जूनमध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. आता यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र दौरा सुरू होण्यापूर्वी, बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलत टीम इंडियाच्या जुन्या प्रशिक्षकाला इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी BCCIचा मोठा निर्णय, जुन्या कोचची घरवापसी
भारतीय संघात जुन्या कोचची घरवापसीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 28, 2025 | 9:41 AM
Share

येत्या 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी आधीच चांगली तयारी सुरू झाली आहे. मात्र या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी बोर्डाने टीम इंडियामध्ये एका जुन्या प्रशिक्षकाला परत आणले आहे. खरं तर, फक्त एक महिन्यापूर्वीच बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमध्ये बदल केले होते. या काळात सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचे राजीनामे घेण्यात आले. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता टी दिलीप यांची इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे.

का केली पुन्हा निवड ?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, खरंतर बीसीसीआय परदेशी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या शोधात होतं, परंतु त्यांना या पदासाठी योग्य उमेदवार सापडला नाही. अखेर बोर्डाने हा निर्णय घेतला. “आम्ही दिलीपची एका वर्षासाठी पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो भारतीय संघासोबत इंग्लंडला जाईल. त्यांचा करार एका वर्षासाठी आहे.” अशी माहिती सूत्रांनी दिली.

टी दिलीप यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीशी दीर्घकाळ संलग्न आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंव्यतिरिक्त, त्यांनी शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल सारख्या सध्याच्या पिढीतील क्रिकेटपटूंसोबतही काम केले आहे. त्यामुळे, त्यांचे आणि भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंमध्ये एक चांगलं नातं आहे आणि प्रत्येकजण एकमेकांचे काम चांगले समजून घेतो.

एवढेच नाही तर टी दिलीपने टीम इंडियाला स्लिप कॅचिंग, शॉर्ट-लेग सारख्या ठिकाणी क्लोज-इन कॅचिंग सुधारण्यात खूप मदत केली आहे. त्याने या पदांसाठी खास खेळाडू तयार केले, जिथे आधी चांगले क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. अनेक खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षणाचे कौतुक केले आहे. इंग्लंडमध्ये या क्षेत्ररक्षणाच्या जागा महत्त्वाच्या असतात कारण स्लिपमध्ये बरेच झेल घेतले जातात.

2021 च्या अखेरीस टी-20 वर्ल्डकप दरम्यान टी. दिलीप हे राहुल द्रविडच्या सपोर्ट स्टाफचा भाग म्हणून संघात सामील झाले. 2024 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर द्रविडचा कार्यकाळ संपला. त्यानंतर, त्यांचा करार मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आला, अखेर त्यांचा त्याचा राजीनामा घेण्यात आला. पण बीसीसीआयला अजूनही त्यांचा पर्याय म्हणून इतर कोणीच सापडलेलं नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांच्यासह भारतीय संघ लौकरच इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.