AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : ‘पडद्याच्या पुढे एक राजकारण आणि पडद्याच्या मागे…’, वानखेडे स्टेडियमवरचा हा PHOTO बघा

IND vs ENG : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप नेते कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, आदिती तटकरे, नमिता मुंदडा, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम असे सर्व पक्षीय राजकारणी या सामन्याला उपस्थित होते.

IND vs ENG : 'पडद्याच्या पुढे एक राजकारण आणि पडद्याच्या मागे...', वानखेडे स्टेडियमवरचा हा PHOTO बघा
wankhede stadium
| Edited By: | Updated on: Feb 03, 2025 | 1:24 PM
Share

भारत आणि इंग्लंडमध्ये काल पाचवा T20 सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली. टीम इंडियाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तब्बल 150 धावांनी टीम इंडियाने हा सामना जिंकला. मैदानात हा सामना रंगलेला असताना प्रेक्षक गॅलरीत एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. एरवी राजकारणाच्या पीचवर परस्परांशी सामना करण्याची एकही संधी न सोडणारे हे राजकारणी वानखेडे स्टेडियमवरच्या प्रेसिडंट बॉक्समध्ये एकत्र बसले होते. महत्त्वाच म्हणजे ही सर्व राजकीय नेते मंडळी हास्य-विनोदात रमली होती. अन्य क्रिकेट प्रेमींप्रमाणे त्यांनी सुद्धा भारत-इंग्लंड सामन्याचा आनंद लुटला.

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप नेते कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, आदिती तटकरे, नमिता मुंदडा, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम असे सर्व पक्षीय राजकारणी या सामन्याला उपस्थित होते. आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे हे एकाच रांगेत काही अंतरावर बसले होते. त्यांच्यात हाय-हॅलो झालं. क्रिकेटवरही त्यांच्यात चर्चा झाली, असं कळतय. एरवी एकमेकांवर टीका करणारे हे राजकीय नेते अशावेळी मात्र एकत्र असतात. क्रिकेटच्या पुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळून पडतात.

राजकारण हे सतत बदलत असतात

दक्षिणेतील राजकारण अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. मतभिन्नता, कटुता इतकी असते, की संवाद सोडा, राजकीय नेते एकमेकांच तोंडही बघत नाहीत. पण महाराष्ट्रातील राजकारण वेगळं आहे. कौटुंबिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सत्ताधारी-विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एकमेकांवर टीका करताना भान राखा. तुमचं राजकीय शत्रुत्व टोक गाठणार नाही याची काळजी घ्या. मैत्री ठेवा. कारण पडद्याच्या पुढे एक राजकारण घडतं, पडद्याच्या मागे वेगळं राजकारण असतं, राजकारण हे सतत बदलत असतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.