Video : हरभजनच्या बोलिंग अॅक्शनची सेम टू सेम नक्कल, दस्तुरखुद्द भज्जीकडून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

| Updated on: Mar 10, 2021 | 3:05 PM

सोशल मीडियावर एका बोलर्सने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या बोलिंगची नक्कल केली आहे. | Harbhajan Singh Bowling Action

Video : हरभजनच्या बोलिंग अॅक्शनची सेम टू सेम नक्कल, दस्तुरखुद्द भज्जीकडून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर
Harbhajan Singh Bowling Action
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर एका बोलर्सने भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगच्या (harbhajan Singh) बोलिंगची नक्कल केली आहे. हा व्हिडीओ दस्तुरखुद्द हरभजन सिंगने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हरभजनची अगदी सेम टू सेम नक्कल या बोलर्सने केली आहे. आपल्या बोलिंगची झलक पाहून हरभजनही अवाक झाला आहे.  (Bowler Imitated harbhajan Singh Bowling Action then Bhajji reaction)

हरभजनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय?

हरभजनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यामध्ये एक फिरकीपटू सेम हरभजनसारखी बोलिंग टाकत आहे. मात्र त्याच्या बोलिंगमध्ये वैविध्य आहे. तब्बल सहा ते सात वेळा तो आपला हात फिरवत आहे. त्यामुळे समोरील फलंदाज कन्फ्यूज होत आहे. अगदी बॉल न समजू शकल्याने तो सोडून देण्याची नामुष्की फलंदाजावर ओढावली. अशा प्रकारचा हा व्हिडीओ आहे.

व्हायरल व्हिडीओवर हरभजन काय म्हणाला?

दस्तुरखुद्द हरभजननेच व्हायरल व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलंय, माझ्यापेक्षाही भारी… चेंडू फिरला की नाही माहिती नाही पण डोकं मात्र फिरलं…’ हा व्हिडीओ मला माझ्या एका मित्राने पाठवल्याचंही हरभजनने सांगितलं आहे.

हरभजनच्या व्हायरल अॅक्शनवर युवराजची कमेंट

हरभजनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर भारताचा खेळाडू युवराज सिंहने मजेशीर कमेंट केली आहे. ‘हरभजनची संकरित जात (आवृत्ती)’ असं म्हणत युवराजने भज्जीला टोला हाणलाय.

हरभजनची अॅक्शन, चाहत्यांना विविध प्रश्न

हरभजनच्या अॅक्शनचा व्हिडीओ पाहून अनेक जण कोड्यात पडले आहेत. खरं तर संबंधित गोलंदाजाने सहा ते सातवेळा हात फिरवलाच कसा आणि फलंदाजाला चेंडू टाकला कसा, त्याने एवढा वेळा जर हात फिरवला तर फलंदाजाने चेंडू खेळायचा कसा?, असे मजेदार प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हरभजन आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार

आयपीएल 2021 मध्ये हरभजन केकेआरकडून खेळणार आहे. भज्जीला सीएसकेने रिलीज केलं होतं ज्यानंतर ऑक्शनमध्ये केकेआरने 2 करोड बेस प्राईस देऊन भज्जीला आपल्या संघात घेतलं. आयपीएलचा प्रारंभ येत्या 9 एप्रिलपासून होणार आहे.

हे ही वाचा :

ठरलं! जसप्रीत बुमराहच्या लग्नाचा बार उडणार; ‘या’ दिवशी गोव्यात संजना गणेशनसोबत बांधणार लगीनगाठ

India vs England T 20I | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत ‘हा’ खेळाडू मॅचविनर ठरणार, व्हीव्हीएस लक्ष्मणची भविष्यवाणी