IND vs NZ : केएल राहुलने अशी बातमी सांगितली की, टीम इंडियाचे फॅन्स होतील खुश
IND vs NZ : भारतीय क्रिकेट टीमने आधीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दमदार प्रदर्शन करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या मॅचआधी टीम इंडियाला थोडी धाकधूक असताना केएल राहुलने आता एक चांगली बातमी दिली आहे.

टीम इंडियाचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया दमदार प्रदर्शन करत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाच दु:ख त्यामुळे थोडं कमी झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय फॅन्सना आता आणखी एक चांगली बातमी मिळालीय. केएल राहुने ही बातमी दिलीय. विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळणाऱ्या केएल राहुलने सांगितलं की, “साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा आणि स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिट आहे”
दुबईमध्ये रविवारी 2 मार्चला टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत. पण या सामन्याचा निकाल ठरवेल की, कोणती टीम पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार. हा सामना फक्त औपचारिकता मात्र नाहीय. महत्त्वाची मॅच आहे ही. टीम इंडियाला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे.
त्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही
रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे दोन्ही दिग्गज पूर्णपणे फिट आहेत. त्यामुळे मॅचच्या एकदिवस आधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारीला टीम इंडियाने पत्रकार परिषद बोलावलेली. त्यात केएल राहुलने दोघांच्या फिटनेसच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. “रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. दोघेही शेवटच्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत” असं केएल राहुल म्हणाला. दोन्ही दिग्गजांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल का? किंवा सेमीफायनलचा विचार करुन आराम देण्यात येईल तो खुलासा राहुलने केला नाही. रोहित आणि शमीच्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही. त्यांना आराम देऊ शकते अशी शक्यता आहे.
काय त्रास झालेला?
पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला झालेल्या सामन्याच्यावेळी रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय कर्णधार बराचवेळ मैदानाबाहेर होता. त्यावेळी उपकर्णधार शुभमन गिलने जबाबदारी संभाळली होती. रोहितनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, तरीही त्याच्या फिटनेसबद्दल संशय कायम आहे. दुसऱ्याबाजूला स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सुद्धा फिटनेस समस्येचा सामना करावा लागला. त्याला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे सुरुवातीच्या 3-4 ओव्हरनंतर तो बराचवेळ मैदानाबाहेर होता. त्यानंतर त्याने मैदानावर येऊन आपला स्पेल पूर्ण केला. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट काढल्या होत्या.
