CWG 2022 Medals Tally : बॉक्सिंगमध्ये भारताला सर्वाधिक पदके, आणखी 15 पदकांची भर, पदतालिका जाणून घ्या…

CWG 2022 Medals Tally  : भारतासाठी 7 ऑगस्ट हा दिवस बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्सच्या दृष्टीने खूप चांगला होता. बॉक्सिंगमध्ये भारताने चार फायनलपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून स्थान मजबूत केले.

CWG 2022 Medals Tally : बॉक्सिंगमध्ये भारताला सर्वाधिक पदके, आणखी 15 पदकांची भर, पदतालिका जाणून घ्या...
रविवारी भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करताना एका सुवर्णासह 4 पदके जिंकली.Image Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:12 AM

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 (CWG 2022) अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आता खेळांमध्ये फक्त एक दिवस उरला असून केवळ काही पदकांसाठी (Medals) स्पर्धा करायची आहे. म्हणजेच सर्व देशांना एकमेकांना मागे टाकण्याच्या काही संधी आहेत. भारत (India) देखील त्यापैकी एक आहे, जो चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी धडपडत आहे. शेवटच्या दिवशी काय होईल, हे सोमवारी म्हणजे आज कळेल. मात्र रविवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. ज्यामध्ये देशाला 5 सुवर्णांसह एकूण 15 पदके मिळाली. मात्र, यानंतरही भारत पाचव्या स्थानावर असला तरी न्यूझीलंड फार दूर नाही. भारतासाठी रविवार 7 ऑगस्ट हा दिवस बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्सच्या दृष्टीने खूप चांगला होता. बॉक्सिंगमध्ये भारताने चार फायनलपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून आपले स्थान मजबूत केले. त्याचबरोबर अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वांना चकित करत तिहेरी उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. ऍथलेटिक्समध्ये रविवारी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 4 पदके आली.

न्यूझीलंड आणि भारताची चुरशीची स्पर्धा

टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक, तर हॉकीमधून कांस्य आणि क्रिकेटमधून रौप्यपदक मिळाले. बॅडमिंटनमध्ये भारताने दोन कांस्यपदक जिंकले. तर 3 अंतिम फेरी निश्चित झाली. टीटीमध्येही अचंता शरथ कमलने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. अशाप्रकारे एकूण 5 सोने घेत भारताच्या खात्यात आता 18 सोने जमा झाले आहेत. रविवारी लागोपाठ मिळालेल्या सुवर्णामुळे भारताने एकदा न्यूझीलंडला मागे टाकून चौथे स्थान पटकावले होते, मात्र किवींनी दमदार पुनरागमन केले.

आता दोघांमध्ये फक्त एका सोन्याचा फरक आहे. यामुळे न्यूझीलंड चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. तथापि, एकूण 55 पदकांसह भारत एकूण संख्येत पुढे आहे. भारतासाठी रविवार 7 ऑगस्ट हा दिवस बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्सच्या दृष्टीने खूप चांगला होता. बॉक्सिंगमध्ये भारताने चार फायनलपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून आपले स्थान मजबूत केले.

हे सुद्धा वाचा

शेवटचा दिवशी

भारताला आता खेळांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज सोमवार 8 ऑगस्टला बॅडमिंटनमधील महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्ण जिंकण्याची संधी आहे. याशिवाय टीटीची फायनलही आहे. त्याच वेळी, बहुतेकांचे लक्ष भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी फायनलवर असेल, जिथे भारताला ऑस्ट्रेलियाची सलग 6 वेळा चॅम्पियन बनण्याची मालिका संपवायची आहे. मात्र, पदकतालिकेतील ऑस्ट्रेलियाची राजवट संपताना दिसत नाही आणि आता त्यांनी दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडवर चांगली आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया 66 सुवर्णांसह पहिल्या तर इंग्लंड 55 सुवर्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....