CWG 2022: ट्रक ड्रायव्हरच्या मुलाने देशासाठी जिंकलं ब्राँझ मेडल, कधी वडिलांकडे डाएटसाठी नव्हते पैसे

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सच दमदार प्रदर्शन सुरु आहे. वेटलिफ्टिंग मध्ये भारताला आज दिवसातील दुसरं पदक मिळालं.

CWG 2022: ट्रक ड्रायव्हरच्या मुलाने देशासाठी जिंकलं ब्राँझ मेडल, कधी वडिलांकडे डाएटसाठी नव्हते पैसे
gururaja
Image Credit source: twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 30, 2022 | 7:02 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सच दमदार प्रदर्शन सुरु आहे. वेटलिफ्टिंग मध्ये भारताला आज दिवसातील दुसरं पदक मिळालं. बर्मिंघम मध्ये भारताचा अनुभवी वेटलिफ्टर गुरुराजा पुजारीने कमालीचं प्रदर्शन केलं. त्याने थेट कास्य पदकाला गवसणी घातली. 61 किलो वजनीगटात त्याने ही पदकविजेती कामगिरी केली. गुरुराजा मोठा खेळाडू आहे.

गुरुराजाचे वडिल ट्रक ड्रायव्हर होते

गुरुराजाचा प्रवास खूपच खडतर होता. हा ट्रक ड्रायव्हरचा मुलगा आहे. गुरुराजाला चार भाऊ आहेत. इतक्या मोठ्या कुटुंबाच पालनपोषण करणं सोपं नाही. एका वेटलिफ्टरला ज्या डाएटची गरज असते, ते गुरुराजाचे वडिल त्याला देऊ शकत नव्हते. चांगलं वजन उचलण्यासाठी तुम्हाला तशा डाएटची गरज असते. पण गरीबीतून वर आलेल्या गुरुराजाने हार मानली नाही. त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरु ठेवला.

पैलवानाचा झाला वेटलिफ्टर

गुरुराजा वेटलिफ्टर आधी पैलवान होता. 2008 साली सुशील कुमारने ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदक विजेती कामगिरी केली. त्याने गुरुराजा खूप प्रभावित झाला. कर्नाटकच्या उडीपी जिल्ह्यात छोट्याशा गावात रहाणाऱ्या गुरुराजाने देशासाठी मेडल जिंकण्याचा चंग बांधला. त्याने कुस्तीची प्रॅक्टिस सुरु केली. कुस्तीच्या तालिमीत जायचा. पण शाळेतल्या शिक्षकाच्या सल्ल्यावरुन त्याने कुस्ती सोडून वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस सुरु केली.

एयरफोर्स मध्ये नोकरीला

गुरुराजाने मागच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये देशासाठी रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. त्याने 249 किलो वजन उचललं होतं. यावेळी त्याने 5 किलो वजन वाढवून मोठ्या कॅटेगरीत सहभागी झाला. गुरुराजा एयरफोर्स मध्ये नोकरीला आहे. छोट्या उंचीमुळे त्याला सैन्यात नोकरी मिळाली नव्हती. एयरफोर्स मध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याच नोकरीच्या बळावर त्याने कुटुंब संभाळलं. सोबत वेटलिफ्टिंगची ट्रेनिंगही सुरु ठेवली. गुरुराजाने सलग दुसऱ्यांदा कॉमनवेल्थ मध्ये पदक विजेती कामगिरी केलीय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें