CWG 2022 Winner List Day 9 : क्रिकेटमध्ये पदक निश्चित, लॉन बॉलमध्ये रचला इतिहास, आजचे पदकविजेते जाणून घ्या…

भारताला आज ऐतिहासिक यश मिळाले. धावपटू अविनाश साबळे याने राष्ट्रकुलमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला तर प्रियंका गोस्वामीनं 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले

CWG 2022 Winner List Day 9 : क्रिकेटमध्ये पदक निश्चित, लॉन बॉलमध्ये रचला इतिहास, आजचे पदकविजेते जाणून घ्या...
अमित पंघालImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:38 PM

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. या दिवशी भारताला अनेक पदके आणि ऐतिहासिक यश मिळाले. क्रिकेटपासून बॉक्सिंग, कुस्ती, अ‍ॅथलेटिक्सपर्यंत भारताने पदके जिंकली आणि निश्चित केली. शुक्रवारी भारतीय कुस्तीपटूंनी जबरदस्त खेळ दाखवला. सहा भारतीय कुस्तीपटू मॅटवर उतरले आणि सर्वांनी पदके जिंकली. भारताला कुस्तीबरोबरच बॉक्सिंगमध्येही अधिक पदकांची अपेक्षा आहे. भारताला आज ऐतिहासिक यश मिळाले आणि ते यश धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने दिले. अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला तर प्रियंका गोस्वामीनं (Priyanka Goswami) 10,000 मीटर शर्यतीत स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. गोस्वामीने प्रथम भारतीय महिला बनून एक नवा इतिहास रचला. गोस्वामीने 43:38.83 चा वैयक्तिक सर्वोत्तम खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या जेमिमा माँटॅग (42:34.30) मागे दुसरे स्थान पटकावले.

बॉक्सिंगमध्ये पदके

भारतीय बॉक्सर अमित पंघल (51 किलो) याने 947 फ्लायवेट स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तर नवोदित नीतू गंगासने महिलांच्या (45-48 किलो) किमान वजनाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निखत जरीननेही 51 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठून पदक निश्चित केले. प्रथम रिंगमध्ये प्रवेश केलेल्या नीतूने तिच्या पहिल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक गाठले ज्यामध्ये तिचा सामना इंग्लंडच्या रेजातेन डेमी जेडशी होईल. तिने उपांत्य फेरीत कॅनडाच्या प्रियांका ढिल्लनला RSC हरवून रौप्य पदक निश्चित केले. यानंतर पंघालने रिंगमध्ये प्रवेश करत आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सलग राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गेल्या वेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, त्यामुळे यावेळी त्याला पदकाचा रंग बदलायला आवडेल. त्याने उपांत्य फेरीत एकमताने घेतलेल्या निर्णयात झिम्बाब्वेच्या पॅट्रिक चिनयाम्बाचा 5-0 असा पराभव केला. 7 ऑगस्टला अंतिम फेरीत त्याचा सामना इंग्लंडच्या मॅकडोनाल्ड किरनशी होणार आहे.

क्रिकेटमध्येही पदक निश्चित

प्रथमच राष्ट्रकुल खेळ खेळणाऱ्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पदक निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधानाच्या 61 धावांच्या जोरावर भारताने 164 धावा केल्या. इंग्लंडचा संघ केवळ 160 धावा करू शकला आणि सामना गमावला.

रवी दहियाचे कुस्तीत पदक निश्चित झाले

त्याचवेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारा भारताचा पुरुष कुस्तीपटू रवी दहिया यानेही अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे नवीननेही अंतिम फेरीत धडक मारली आहे.

लॉन बॉल्समध्ये भारतासाठी रौप्य

भारताच्या पुरुष संघाने लॉन बॉल्समध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पुरुषांच्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडने भारताचा 18-5 असा पराभव केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.