AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Tour Sri Lanka | श्रीलंकेतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर टांगती तलवार, मालिका रद्द होणार?

टीम इंडिया (Team India) या दौऱ्यात वनडे (Odi) आणि टी 20 मालिका (T20 series) खेळणार आहे.

India Tour Sri Lanka | श्रीलंकेतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यावर टांगती तलवार, मालिका रद्द होणार?
भारतीय संघ
| Updated on: May 12, 2021 | 6:36 PM
Share

कोलंबो : टीम इंडिया जुलै महिन्यात विराट कोहली आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व युवा खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच हे खेळाडू या दौऱ्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या दौऱ्यावर कोरोनाचे सावट आहे. श्रीलंकेत गेल्या 2 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (Corona outbreak in Sri Lanka India tour of Sri Lanka likely be cancelled)

श्रीलंकेत मंगळवारी 11 मे ला कोरोनाच्या 2 हजार 568 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 38 रुग्ण हे परदेशातून प्रवास करुन आले आहेत. तर 10 मे ला 2 हजार 624 रुग्ण आढळले होते. त्यामुळे या दौऱ्यावर कोरोनाचे सावट आहे.

एकाच स्टेडियममध्ये दोन्ही मालिका

खेळाडूंना सामन्यानिमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीपासून एकाच ठिकाणी सर्व सामने खेळवण्याचा कळ हा संबंधित क्रिकेट मंडळाचा असतो. त्यानुसार या श्रीलंका दौऱ्याचंही आयोजन हे प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. “संपूर्ण मालिका एकाच ठिकाणी खेळण्याचा आमचा मानस आहे. या वनडे आणि टी 20 अशा दोन्ही मालिकेतील सामने इथेच खेळवण्याची आमची योजना आहे”, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटचे चेयरमेन अर्जुन डी सिल्वा यांनी दिली.

टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत पोहचेल. त्यानंतर पुढील आठवडा भारतीय संघ क्वारंटाईन राहिल. यानंतर 13 जुलैपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. तर त्यानंतर 22 जुलैपासून टी 20 सीरिजचा शुभांरभ होईल.

मालिका होणार की नाही?

अर्जुन डी सिल्वा पुढे म्हणाले, “वनडे आणि टी 20 मालिका होणार की नाही, हे सर्व जुलैमधील परिस्थितीवर अवलंबून असेल. कोरोनामुळे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना प्रवेश नसेल. त्यामुळे हे सर्व सामने विना प्रेक्षक खेळवण्यात येतील”.

टीम इंडियाचा संभाव्य संघ

पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर.

संबंधित बातम्या :

चेतन साकरिया, पीयूष चावलानंतर ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

आयपीएलमध्ये झालेली ‘ही’ चूक BCCI पुन्हा करणार नाही, उचललं कठोर पाऊल

(Corona outbreak in Sri Lanka India tour of Sri Lanka likely be cancelled)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.