AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्थगितीमुळे निराश क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी, गेल-रसेल-पोलार्डचं वादळ पुन्हा घोंघावणार, तारीख ठरली!

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची (Caribbean Premier League) घोषणा केली आहे. (CPL 2021 Tournament Date Announced)

IPL स्थगितीमुळे निराश क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी, गेल-रसेल-पोलार्डचं वादळ पुन्हा घोंघावणार, तारीख ठरली!
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची (Caribbean Premier League) घोषणा केली आहे.
| Updated on: May 21, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित झाल्यामुळे क्रिकेट रसिक निराश झाले. परंतु त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सीपीएल (CPL) अर्थात कॅरेबिअन प्रिमीअर लीगची (Caribbean Premier League) घोषणा केली आहे. त्यामुळे युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन यांचं वादळ पुन्हा मैदानात घोंघावणार आहे.  28 ऑगस्टला स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी सीपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. (CPL Caribbean Premier League 2021 Tournament Date Announced)

सामने कुठे होणार?

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने, कॅरेबियन प्रीमियर लीगचं नववं सत्र 28 ऑगस्टपासून सुरू होईल. सुमारे एक महिन्यापर्यंत चालणार्‍या लीगचा अंतिम सामना 19 सप्टेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केवळ दोन मैदानावरच सामन्यांचं आयोजन होणार आहेत. सेंट किट्स आणि नेव्हिस या दोन मैदानांवर सामने खेळविले जाणार आहे.

दिग्गजांचं वादळ घोंघावणार

जागतिक क्रिकेटमध्ये नेहमीच वेस्ट इंडिजच्या क्रिकेटर्सचा दबदबा राहिलेला आहे. त्यांच्या आक्रमक खेळाने त्यांनी नेहमीच जगभरातील क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. दरवर्षी सीपीएलच्या माध्यमातून वेस्ट इंडिज क्रिकेटपटू चौकार-षटकारांचे अनेक विक्रम रचतात. ख्रिस गेल, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, शिमरन हेटमायर यांसारख्या दिग्गजांचा खेळ सीपीएलमध्ये बघायला मिळत असतो.

सीपीएलमध्ये सहा संघ सहभागी

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहा संघ सहभागी होतील. गतविजेत्या ट्रिनबागो नाइट रायडर्सने लीग सुरू होण्यापूर्वी प्रवीण तांबे, टिम सेफर्ट, फवाद अहमद आणि आमिर झांगू यांना संघातून वगळलंय. ट्रिनबागो नाइटने दिनेश रामदिनला संघात घेतलंय. त्याच वेळी, सेंट लुसिया ज्यूक्स संघाने सात खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या मोसमात सात गुणांसह गुणतालिकेत संघ तिसऱ्या क्रमांकांवर होता . यावर्षी वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी सीपीएलमध्ये भाग घेणार नाही.

हे ही वाचा :

टीम इंडियाचा सर्वांत जास्त शिकलेला क्रिकेटर, ज्याला भारताचा ग्रेन मॅक्ग्रा म्हटलं गेलं, पण पुढे…

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 19 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात, पाहा कसा असेल दौरा!

‘तो मेहनती नव्हता, मतलबी होता, संघात फक्त माझं ऐकावं अशी त्याची वृत्ती’, ग्रेग चॅपेल यांचे सौरव गांगुलीवर सनसनाटी आरोप 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.