भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 19 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात, पाहा कसा असेल दौरा!

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेला सुरुवात होईल. (India Women Cricket team Tour of Australia Full Schedule)

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, 19 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात, पाहा कसा असेल दौरा!
भारतीय महिला संघ

मुंबई : भारतीय महिला संघ (India Women Cricket team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यात भारतीय संघ पहिल्यांदाच डे नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे. पर्थ क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी गुरुवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कार्यक्रमाची घोषणा केली. (India Women Cricket team Tour of Australia Full Schedule)

महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची भारताची कायम भूमिका राहिलेली आहे. जय शाह यांनी ट्विटरवरुन सांगितलं की “महिला क्रिकेटविषयीची भारताची वचनबद्धता पुढे ठेवून, भारतीय महिला क्रिकेट टीम या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये डे-नाईट टेस्ट खेळेल, ही घोषणा करताना मला आनंद होतोय.”

भारत गेल्या सात वर्षांतील पहिली कसोटी खेळणार

भारतीय महिला संघ 16 जूनपासून इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. गेल्या सात वर्षांतील ही पहिली कसोटी असेल. यानंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. तिथे एकदिवसीय, कसोटी आणि टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅटमधील सामने उभय संघात खेळवले जाणार आहेत.

महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकमेव डे नाईट कसोटी

भारताकडून अद्याप जरी घोषणा झालेली नसली तरी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मालिका जवळपास निश्तित झाल्याचे तसे संकेत दिले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी 2006 साली खेळला. महिला क्रिकेटमध्ये केवळ एक डे नाईट कसोटी मॅच पार पडलीय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सिडनीमध्ये 2017 दरम्यान सिडनीमध्ये हा सामना खेळला गेला होता.

असा असेल ऑस्ट्रेलिया दौरा

कॉमनवेल्थ बँक सिरीज

19 सप्टेंबर- पहिला एकदिवसीय सामना (ओवल, सिडनी) 22 सप्टेंबर- दुसरा एकदिवसीय सामना (ओवल, सिडनी) 24 सप्टेंबर-तिसरा एकदिवसीय सामना (ओवल, सिडनी)

30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर – डे नाईट कसोटी मॅच

7 ऑक्टोबर- पहिला टी ट्वेन्टी सामना 9 ऑक्टोबर -दुसरा टी ट्वेन्टी सामना 11 ऑक्टोबर – तिसरा टी ट्वेन्टी सामना

(India Women Cricket team Tour of Australia Full Schedule)

हे ही वाचा :

‘तो मेहनती नव्हता, मतलबी होता, संघात फक्त माझं ऐकावं अशी त्याची वृत्ती’, ग्रेग चॅपेल यांचे सौरव गांगुलीवर सनसनाटी आरोप 

भारताविरुद्धच्या मालिकेअगोदर इंग्लंडला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर!

इंग्लंडच्या एका निर्णयावर IPL 2021 चं भवितव्य अवलंबून, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB साद देणार?

Published On - 8:37 am, Fri, 21 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI