AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : शुबमन गिल- शाहीन आफ्रिदी यांच्यात राडा, अभिषेक शर्मा सामन्यानंतर म्हणाला…

आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानी गोलंदाजांना रडकुंडीला आणलं. पॉवर प्लेमध्ये अर्ध्याहून अधिक खेळ खल्लास केला. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाज हतबल झाले आणि भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण यावेळेस भारतीय खेळाडूंनी तसंच उत्तर दिलं.

IND vs PAK : शुबमन गिल- शाहीन आफ्रिदी यांच्यात राडा, अभिषेक शर्मा सामन्यानंतर म्हणाला...
शुबमन गिल- शाहीन आफ्रिदी यांच्यात राडा, अभिषेक शर्मा सामन्यानंतर म्हणाला...Image Credit source: Francois Nel/Getty Images
| Updated on: Sep 22, 2025 | 1:05 AM
Share

भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की शा‍ब्दिक चकमक होणार यात काही शंका नाही. पण यावेळची स्थिती काही वेगळी आहे. भारतीय खेळाडूंच्या मनात पहलगाम हल्ल्याची सळ आहे. त्यामुळे पाकिस्तानचा चेंदामेंदा करण्याची एकही संधी सोडली नाही. साखळी फेरीनंतर भारतीय खेळाडूंनी सुपर 4 फेरीत पाकिस्तानचे कपडे काढले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पाकिस्तानला पहिल्या चेंडूपासून दणका दिला. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. अभिषेक शर्माने तर त्याला अक्षरश: सोलून काढला. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदी आपला राग वारंवार व्यक्त करत होता. नेमकं या सामन्यात काय झालं ते जाणून घ्या

पाकिस्तानने 172 धावांचं दिलेलं आव्हान गाठण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल जोडी मैदानात आली. पहिल्याच चेंडू शाहीनने बाउंसर टाकला. अभिषेकने त्या संधीचं सोनं करत पुल शॉट मारत बाउंड्री पार पोहोचवला. शाहीनची ख्याती पहिल्या षटकात विकेट घेण्याची आहे. पण त्याला षटकार मारत बॅकफूटवर ढकलला. अभिषेक शर्माच्या आक्रमक शैलीमुळे शाहीन आफ्रिदी बावचळला. पुढच्या षटकात त्याने गिलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याने चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यावेळी शाहीन रागाच्या भरात काहीतरी पुटपुटत होता. तेव्हा त्याने बाउंड्री दाखवत चेंडूत तिथे पोहोचवला आहे असा इशारा दिला.

अभिषेक शर्मा आणि हारिस रउफ यांच्यातही शा‍ब्दिक चकमक झाली. तेव्हा अभिषेक शर्माने त्याला जसाच तसं उत्तर दिलं. सामन्यानंतर त्याने या प्रसंगावर आपलं मत व्यक्त केलं. ‘आजचा दिवस खूपच सोपा होता, ते ज्या पद्धतीने आमच्याकडे कोणत्याही कारणाशिवाय येत होते, ते मला अजिबात आवडले नाही. म्हणूनच मी त्यांच्या मागे गेलो. मला संघासाठी कामगिरी करायची होती.’, असं उत्तर अभिषेक शर्माने सामन्यानंतर दिले.  अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये केलेल्या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तान तिथेच नांगी टाकून दिली होती.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.