अभिषेक शर्माला घडवण्यासाठी वडिलांनी घेतली होती रिस्क, चुकून जरी…. पाहा Video
अभिषेक शर्मा हे क्रिकेट विश्वातील सध्या चर्चेत असलेलं नाव... त्याची आक्रमक खेळी पाहून गोलंदाजांना घाम फुटल्याशिवाय राहात नाही. अभिषेक शर्माची आक्रमक स्टाईल अशीच घडली नाही. त्यासाठी वडिलांनी घेतली होती रिस्क...

आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा हुकूमाचा एक्का आहे. सलामीला येत आक्रमक खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला अर्ध करण्याची कामगिरी करतो. त्यामुळे समोर अभिषेक शर्मा असला की गोलंदाजांना घाम फुटतो. तसेच भारतीय संघाला विजयाची पक्की खात्री असते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची धुलाई केली होती. पहिल्या दोन चेंडूतच त्याची हवा काढली होती. अभिषेक शर्मा फलंदाज करत असताना त्याचे वडील मैदानात उपस्थित होते. राजकुमार शर्मा यांनी त्याची खेळी पाहिली. राजकुमार शर्मा यांनी अभिषेक शर्मा वेगवान गोलंदाजांना इतक्या सर्राइतपणे कसा खेळतो? यावरचा पडदा दूर केला. राजकुमार शर्मा यांनी अभिषेकला क्रिकेटपटू बनवण्यासाठी एक मोठी रिस्क घेतली होती. त्याचा खुलासा बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत केला आहे.
अभिषेक शर्माचे वडिलांनी बीसीसीआयशी बोलताना सांगितलं की, ‘जेव्हा मी अभिषेकचा सराव घ्यायचो. तेव्हा अंडर 16 मध्ये मी त्याला 150 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या चेंडूंचा सामना करण्याचा सराव दिला. सर्व सांगायचे त्याला चेंडू लागू शकतो. मी यासाठी अभिषेकला विचारायचो की खेळणार का? तेव्हा तो हा म्हणून मला सांगायचा. इतकंच काय तर आणखी वेगाने टाकला तरी चालेल. पॉवर हिटिंग त्याच्याकडे नैसर्गिक आहे. तसेच वेगवान चेंडू खेळून त्याची टेक्निक झाली आहे.‘ अभिषेकला घडवण्यात त्याच्या वडिलाचा मोठा हात आहे. अभिषेकच्या वडिलांनी सांगितले की युवराज सिंगचाही त्याच्या यशात मोठा वाटा आहे. अभिषेकच्या वडिलांनी सांगितले की, ‘अभिषेक शर्माच्या कारकिर्दीत युवराज सिंगचा मोठा हात आहे. त्याने त्याला खूप वेळ दिला, त्याचा अनुभव सांगितला. मी युवराजचा खूप आभारी आहे.’
𝙏𝙝𝙚 𝙈𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙊𝙛 𝘼𝙗𝙝𝙞𝙨𝙝𝙚𝙠 𝙎𝙝𝙖𝙧𝙢𝙖
We’ve watched @IamAbhiSharma4 hit big sixes, now hear it from his proud father on how the southpaw made it to the big stage 😊 By @RajalArora
P. S- A special shoutout to the legendary @YUVSTRONG12#TeamIndia | #AsiaCup2025
— BCCI (@BCCI) September 16, 2025
राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, अभिषेक पुढे जाऊन गोलंदाजीतही महत्त्वाची भूमिका बजावेल आणि टीम इंडियाला जिंकवून देईल. ‘मी स्वत: डावखुरा गोलंदाज आहे. मी पण खूप सारं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलो आहे. मी त्याच्याकडून गोलंदाजी करवून घ्यायतो. त्याच्या हाताची पोझिशन बघायचो आणि त्यामुळे तो एक चांगला गोलंदाज झाला. येणाऱ्या काळात टीम इंडियासाठी चांगली गोलंदाजी करेल.‘
