खरंच असं होईल का? अभिषेक शर्माचा टॅटू टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान चर्चेत, लिहिलं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारताने अमेरिकेला नमवून विजयी सुरूवात केली. पण अभिषेक शर्माकडून भ्रमनिरास झाला. त्याच्याकडून अपेक्षित खेळी झालीच नाही. आता नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्मा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण थोडं वेगळं आहे.

खरंच असं होईल का? अभिषेक शर्माचा टॅटू टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान चर्चेत, लिहिलं की...
खरंच असं होईल का? अभिषेक शर्माचा टॅटू टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान चर्चेत, लिहिलं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 10, 2026 | 5:33 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झाला. या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि स्पर्धेची सुरुवात सकारात्मक केली आहे. पण या सामन्यात अभिषेक शर्मा फेल गेला. पहिल्याच चेंडूवर विकेट दिल्याने भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान याने पहिल्याच चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. आता अभिषेक शर्मा पुढच्या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष लागून आहे. नामिबिया विरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. खरं तर अभिषेक शर्मा पहिल्या चेंडूवर बाद झाला तरी भारतीय क्रीडाप्रेमींना फार काही वाटत नाही. कारण त्याचा फलंदाजीचा अंदाजच तसा आहे. नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्माची बॅट चालली तर एकटा सामना संपवण्याची ताकद ठेवतो. असं असताना या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माचा एक टॅटू सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याने आपल्या उजव्या हातावर हा टॅटू गोंदवला आहे.

अभिषेक शर्माच्या या टॅटूत खास मेसेज आहे. अभिषेकने IT WILL HAPPEN असा मेसेज गोंदवला आहे. याचा अर्थ, तसंच होईल. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावेन, असा अर्थ यातून निघतो. हा टॅटू टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पाहिला जात आहे. अभिषेक शर्माच्य मनात असं असावं की, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याची बॅट तळपावी, शतक ठोकावं आणि भारताने पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप जिंकावा. आता नेमका अर्थ काय तो अभिषेक शर्माच सांगू शकतो. त्याने या मेसेजबाबत कुठेच वाच्यता केलेली नाही. त्यामुळे नेटकरी ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ काढत आहेत.

अभिषेक शर्माने यापूर्वी असं वेगळं सेलीब्रेशन केलं होतं. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धेत चर्चेत आला होता. पंजाब किंग्सविरुद्ध वादळी शतक ठोकल्यानंतर त्याने एक चिठ्ठी काढून दाखवली होती. त्यावर लिहिलं होतं की, हे ऑरेंज आर्मीसाठी आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने 55 चेंडूत 10 षटकारांच्या मदतीने 141 धावा केल्या होत्या. आता अभिषेक शर्माने हातावर गोंदवल्याने काय करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढच्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर मेसेज दाखवेल असा अंदाज क्रीडाप्रेमी बांधत आहेत.