Urmila Matondkar | “वेलडन अजिंक्य, देशाला तुमचा अभिमान”, रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकरकडून तोंडभरुन कौतुक

Urmila Matondkar | वेलडन अजिंक्य, देशाला तुमचा अभिमान, रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकरकडून तोंडभरुन कौतुक
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने टीम इंडियाचं ट्विट करत कौतुक केलं आहे.

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटद्वारे कर्णधार अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

sanjay patil

|

Dec 29, 2020 | 1:59 PM

मेलबर्न : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात (AUS vs IND 2nd Test) चौथ्या दिवशीच 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रहाणेच्या या नेतृत्वासाठी त्याचं देशासह क्रीडा विश्वातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड  अभिनेत्री आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी रहाणेसह टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. (Actress Urmila Matondkar praises Team India with captain Ajinkya Rahane)

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

“वेल डन अजिंक्य. तमाम महाराष्ट्रासह देशाला आपलास खूप अभिमान आहे. विजयासाठी टीम इंडियाचं अभिनंदन”, या आशयाचं ट्विट उर्मिलाने केलं आहे.

अजिंक्यचं कौतुक करणारं ट्विट

तसेच पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंनी रहाणेला ट्विटमध्ये मेंशन करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

आदित्य ठाकरेंचं ट्विट

अजिंक्यने या कसोटीतील पहिल्या डावात 112 धावांची शानदार शतकी खेळी केली. आदित्य ठाकरेंनी या शतकी खेळीसाठी अजिंक्यचं ट्विटद्वारे अभिनंदन केलं होतं. अजिंक्यच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हे दुसरं शतक ठरलं. अजिंक्यने 2014 मध्ये मेलबर्नवर शतक ठोकलं होतं. विशेष म्हणजे रहाणेने हे दोन्ही शतकं बॉक्सिंग डे कसोटीत लगावली. रहाणे अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.

अजिंक्यच्या शतकाचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक

उर्मिला मातोंडकर यांचा अल्प पररिच

उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. उर्मिलाचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिलाच्या डान्सचेही अनेक चाहते आहेत. तिने काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात ती झळकली.

उर्मिला मातोंडकर यांनी कांग्रेसचा हात सोडत  मातोश्रीवर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिला यांची विधानपरिषदेसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिवसेनेत प्रवेश करण्याआधी उर्मिला यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उर्मिला यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गोपाळ शेट्टींविरोधात 2019 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा 4 लाख 53 हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलाचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला

विधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही : अनिल परब

(Actress Urmila Matondkar praises Team India with captain Ajinkya Rahane)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें