
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना संघांची घोषणा केली जात आहे. अफगाणिस्तानने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या निवडकर्त्यांनी 31 डिसेंबर रोजी वेस्ट इंडिज आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. अफगाणिस्तानचा संघ 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान युएईमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.या संघातून मॅच विनर फिरकीपटूला डावलण्यात आल आहे. मिस्ट्री फिरकीपटू अल्लाह गजनफर याला संघात स्थान दिलं नाही. मिस्ट्री स्पिनर अल्लाह गजनफरचा टी20 रेकॉर्ड चांगला असूनही त्याला संघात संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अल्लाह गजनफरने फक्त 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात दोन विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याचा इकोनॉमी रेट हा 6 धावा प्रति षटकं आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 60 सामन्यात 74 विकेट घेतल्या आहेत.
टी20 वर्ल्डकप संघाची धुरा राशीद खानच्या खांद्यावर आहे. एसीबीचे मुख्य निवडकर्ते अहमद शाह सुलेमानखिल यांनी सांगितलं की, अल्लाह गजनफरला बाहेर करणं सोपा निर्णय नव्हता. त्याच्या जागी मुजीबला संघात स्थान दिलं आहे. शाहिद उल्लाह कमालने अलिकडच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि तो एक चांगला डावखुरा फलंदाज आहे जो मोठ्या स्पर्धांमध्ये खूप महत्त्वाचा ठरू शकतो. खांद्याच्या दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू गुलबदिन नायब आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांना संघात स्थान दिलं आहे. मधल्या फळीतील फलंदाज शाहिद उल्लाह कमाल आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद इशाक याला संधी मिळाली आहे. तर युवा वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदझाईचाही संघात समावेश करण्यात आला आहे.फजल हक फारुकीचाही संघात समावेश केला आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 साठी अफगाणिस्तानचा संघ : राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झद्रान (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूल, शाहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर हकीन अहमद, मुजीब उर रहमान, नूर अहमद, मुजीब उर-हक्की, नवाज अहमद, फक्की.