AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs AFG Toss : ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू बाहेर

Australia vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडत आहेत. या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकला असून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.

AUS vs AFG Toss : ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू बाहेर
| Updated on: Nov 07, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 39 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान एकमेकांना भिडत आहेत. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडत आहे. अफगाणिस्तानने अर्धी लढाई जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या असलेल्या कांगारूंचं कडवं आव्हान अफगाणिस्तानसमोर असणार आहे. या सामन्याआधी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे.  स्टार खेळाडू या सामन्यात खेळणार नाही.

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ या सामन्यामध्ये खेळणार नाही. स्मिथ याची तब्येत खराब असल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही. इतकंच नाहीतर ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन याचासुद्धा प्लेइंग 11 मध्ये समावेश नाही. दोघांना खाली बसवण्यात आलं असून त्यांच्या जागी  मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा संघात समावेश केला गेला आहे.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला तर सेमी फायनलमध्ये जाणारा तो तिसरा संघ ठरणार आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने उलटफेर केला तर सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी ते आपली बाजू आणखी भक्कम करतील. वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे टॉस अफगाणिस्तानच्या पारड्यात पडल्याने ते किती धावा बवनतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (c), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (w), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (W), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.