
Pakistan Cricket Board on T20 World Cup: आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यावरून राजकारण तापले आहे. भारताचा द्वेष हेच त्यामागील प्रमुख कारण आहे. पण भारताचा द्वेष करतानाच या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्ड दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश अडेलतट्टू भूमिकेने अगोदर बाहेर फेकल्या गेला आहे. तर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नखरे सुरू झाले आहेत. PCB ने जोपर्यंत बांग्लादेश या सामन्यात नसेल तोपर्यंत न खेळण्याचा डाव टाकला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या विश्वचषकात खेळणे बंधनकारक असल्याचे सुनावल्याचे कळते. जर पाकिस्तान या विश्वचषकात खेळला नाही तर पीसीबीवर कडक प्रतिबंध घातले जाऊ शकतात. या कारवाईमुळे बांग्लादेश पाठोपाठ अगोदरच आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या पीसीबीचे कंबरडे मोडू शकते.
PCB चे अस्तित्वच धोक्यात
आयसीसीच्या सूत्रांनी याविषयीचे मोठे संकेत दिले आहे. त्यानुसार पाकिस्तानने या विश्वचषकावर जर बहिष्कार घातला तर त्याचे गंभीर परिणाम पीसीबीवर दिसतील. पीसीबीचे अस्तित्वच धोक्यात येईल. पीसीबीवर कडक प्रतिबंध लावण्यात येतील. त्याचा परिणाम केवळ मैदानावरच नाही तर पाकिस्तानच्या क्रिकेट अर्थकारणावर होईल. अगोदरच हे बोर्ड पैशाच्या तंगीने हैराण आहे. आता त्यात पीसीबी पायावर कुऱ्हाड मारून घेण्याच्या पूर्ण तयारीत आहे.
ICC कडून कोणती कारवाई?
पाकिस्तान सुपर लीगसाठी (PSL)परदेशी खेळाडूंना नाहरकत देण्यात येणार नाही. त्यामुळे या लीगकडे परदेशी खेळाडू पाठ फिरवतील.
PSL ला अधिकृत मान्यता नसेल. त्यामुळे जागतिक पातळीवर यात खेळणाऱ्या खेळाडूंना महत्त्व नसेल
मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. यामध्ये ब्रॉडकास्टिंग, स्पॉन्सरशिप, फ्रँचाईज व्हॅल्यू कशाचाही फायदा होणार नाही
आशिया कपमधूनही पाकिस्तानला बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे एकूणच क्रिकेट जगतातून पाकिस्तान बोर्ड बहिष्कृत होईल.
हा देश कोणत्याही देशासोबत कसोटी, एकदिवशीय सामना, टी20 सामना आयोजित करू शकणार नाही. तर पाकिस्तानविरोधात कोणताही संघ क्रिकेट खेळू शकणार नाही.
भारत द्वेष महागात पडणार
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला भारताचा द्वेष करणे महागात पडणार आहेच. तीच अवस्था आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची होण्याची शक्यता आहे. केवळ भारताला टार्गेट करून हे दोन्ही देश मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानची इज्जत जागतिक पातळीवर टांगली. भारत क्रिकेट सामना खेळला. पण क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन केले नाही. इतकेच नाही तर आशिया कप सुद्धा घेतला नाही. पण टीम इंडिया क्रिकेट सामना खेळली. भारताने आयसीसीच्या धोरणाविरोधात कोणताही निर्णय घेतला नाही. पण बांग्लादेश आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो कांगावा करत आहेत. त्यामुळे त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तर प्रतिबंधामुळे अनेक दिवस क्रिकेट जगतापासून दूर राहावं लागेल.