CSK IPL 2023 Winner : हरल्यानंतर Hardik Pandya ने कोणालाच दोष नाही दिला, फक्त एवढच म्हणाला….

CSK IPL 2023 Winner : फायनलमध्ये सर्वोच्च क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार हे स्पष्ट होतं, घडलं सुद्धा तसच. एक कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार, तसं चेन्नई जिंकली, गुजरातची टीम हरली.

CSK IPL 2023 Winner : हरल्यानंतर Hardik Pandya ने कोणालाच दोष नाही दिला, फक्त एवढच म्हणाला....
GT Captain Hardik Pandya after losing ipl 2023 final against CSKImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 9:23 AM

अहमदाबाद : पावसाने व्यत्यय आणूनही क्रिकेट चाहत्यांनी काल IPL 2023 च्या फायनलचा थरार अनुभवला. क्रिकेटमध्ये लास्ट बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 15 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. सीएसकेला विजयासाठी 171 धावांच टार्गेट मिळालं होतं. गुजरात टायटन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 214 धावा केल्या होत्या.

लास्ट ओव्हरमध्ये CSK ला विजयासाठी 6 चेंडूत 13 धावांची गरज होती आणि पहिल्या चार चेंडूत 3 धावा आल्या. त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 धावा हव्या होत्या. त्यावेळी रवींद्र जडेजाने सिक्स आणि चौकार मारत सीएसकेला पाचव विजेतेपद मिळवून दिलं.

कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार

हे सुद्धा वाचा

IPL 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीम्सनी सरस खेळ दाखवला. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम पहिल्या आणि चेन्नई दुसऱ्या स्थानावर होती. दोन्ही तुल्यबळ टीम्स होत्या. फायनलमध्ये सर्वोच्च क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार हे स्पष्ट होतं, घडलं सुद्धा तसच. एक कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार, तसं चेन्नई जिंकली, गुजरातची टीम हरली.

‘आम्ही जिंकलो एकत्र, हरलो एकत्र’

हरल्यानंतर बोलताना गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याच्या मनात पराभवाची खंत होती. पण त्याने खिलाडूवुत्ती दाखवली व जिंकून घेणारे शब्द बोलला. “आम्ही मनापासून खेळलो, सर्वच आघाड्यांवर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही एक टीम म्हणून खेळलो, कोणीही हार मानली नाही. आम्ही जिंकलो एकत्र, हरलो एकत्र. आज तोच सामना असावा, ज्यात आमचा पराभव झाला” असं हार्दिक पांड्या म्हणाला. हार्दिक पांड्याचे धोनीबद्दल जिंकून घेणारे शब्द

“पराभवानंतर मी कारण देणार नाही. सीएसकेची टीम आमच्यापेक्षा चांगली खेळली. साई सुदर्शन भविष्यात अजून चांगली कामगिरी करेल. मी माझ्या टीमवर खूश आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी मिळवलेल यश हे त्यांच यश आहे. मोहित, शमी, राशिद यांनी त्यांच्याबाजूने सर्व प्रयत्न केले. मी कोचिंग स्टाफच सुद्धा कौतुक करेन. मी त्यांच्याकडून अजून अपेक्षा करु शकत नाही. मी धोनीसाठी खूप आनंदी आहे. विजेतेपद हे त्याच्या नशिबात लिहिल होतं. त्याच्याकडून हरलो याच मला अजिबात वाईट वाटत नाही. चांगल्या गोष्टी, चांगल्या लोकांबरोबर घडतात” असं हार्दिक पांड्या म्हणाला.

Non Stop LIVE Update
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.