AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricketer Car Accident | ऋषभ पंतनंतर आणखी एका प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या कारला भीषण अपघात, सोबत होता मुलगा

Cricketer Car Accident | ऋषभ पंतनंतर टीम इंडियाच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या कारला अपघात झालाय. टीम इंडियाकडून हा क्रिकेटपटू 6 टेस्ट, 68 वनडे आणि10 टी-20 सामने खेळलाय. स्विंग गोलंदाजी त्याची खासियत होती.

Cricketer Car Accident | ऋषभ पंतनंतर आणखी एका प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूच्या कारला भीषण अपघात, सोबत होता मुलगा
Team India cricketer Car Accident
| Updated on: Jul 05, 2023 | 2:04 PM
Share

लखनऊ : मागच्यावर्षाच्या अखेरीस टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. ऋषभ दिल्लीहूने डेहराडूनला आपल्या घरी आईला भेटायला चालला होता. त्यावेळी ही भीषण दुर्घटना घडली होती. दैव बलवत्तर असल्याने ऋषभ पंत या भीषण कार अपघातातून वाचला होता.

मागचे काही महिने ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. ऋषभ पंत मैदानावर कधी पुनरागमन करणार? त्या बद्दल अजूनही स्पष्टता नाहीय.

क्रिकेटरसोबत कारमध्ये त्याचा मुलगाही

आता टीम इंडियाकडून खेळलेल्या आणखी एका क्रिकेटपटूच्या कारला भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी क्रिकेटपटूसोबत त्याचा मुलगाही कारमध्ये होता. भारतीय गोलंदाजी आक्रमणाची धार राहिलेला वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारच्या कारला मंगळवारी अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रवीण कुमारसोबत त्याचा मुलगाही होता.

कशी आहे तब्येत?

प्रवीण कुमार पांडव नगरहून परत येत होता, त्यावेळी हा अपघात झाला. एक कँटर त्याच्या गाडीला धडकला. या अपघातात प्रवीण कुमारच्या कारच खूप नुकसान झालय. पण सुदैवाने प्रवीण कुमार आणि त्याच्या मुलाचे प्राण वाचले. दोघे गंभीर जखमी झालेले नाहीत.

पोलिसांनी ड्रायव्हरला घेतलं ताब्यात

ज्या कँटरसोबत प्रवीण कुमारच्या कारची धडक झाली, त्या ड्रायव्हरला घटनास्थळावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. क्रिकेटर प्रवीण कुमार मेरठच्या मुल्तानमध्ये राहतो. प्रवीण कुमारची कार रात्री पांडव नगरमधून जात होती. त्याचवेळी त्याची लँड रोव्हर कार कँटरला धडकली.

कारची किंमत किती?

सिव्हिल लाइन कमिश्नरी चौकात हा अपघात झाला. पोलिसांना या दुर्घटनेची माहिती मिळताच ते लगेच तिथे पोहोचले. कँटरच्या ड्रायव्हरला अटक केली. प्रवीण कुमारच्या अपघातग्रस्त कारची किंमत 2.50 कोटी रुपये आहे. टीम इंडियाकडून खेळताना किती विकेट काढल्या?

प्रवीण कुमार सध्या भारतीय टीमचा भाग नाहीय. त्याच्या बळावर टीम इंडियाने अनेक सामने जिंकले आहेत. प्रवीण कुमार टीम इंडियाकडून 6 कसोटी, 68 वनडे आणि 10 T20 सामने खेळलाय. 68 वनडे सामन्यात प्रवीण कुमारने 77 विकेट घेतले. 10 T20 सामन्यात 8 विकेट आणि 6 टेस्ट मॅचमध्ये 27 विकेट घेतले. 2007 मध्ये प्रवीण कुमारने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मार्च 2012 पासून प्रवीण कुमार एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. IPL मध्येही तो 2017 मध्ये शेवटचा खेळला होता.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.