AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: मुंबईला नमवताच KKR गुणतालिकेतही टॉप 4 मध्ये दाखल, मुंबईची मात्र घसरण

आयपीएलच्या उर्वरीत पर्वाची धमाकेदार सुरुवात करत केकेआरने (KKR) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या सामन्यात विराटच्या आरसीबीला नमवल्यानंतर आता रोहितच्या मुंबईवरही केकेआरने विजय मिळवला आहे.

IPL 2021: मुंबईला नमवताच KKR गुणतालिकेतही टॉप 4 मध्ये दाखल, मुंबईची मात्र घसरण
केकेआर संघ
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 3:22 PM
Share

IPL 2021: आयपीएलच्या उर्वरीत पर्वात इयॉन मॉर्गन कर्णधार असणारी केकेआर नव्या रंगात दिसत आहे. हा रंग म्हणजे विजयाचा रंग आहे. आधी विराटच्या आरसीबीला नमवल्यानंतर आता केकेआरने बलाढ्या मुंबई इंडियन्सला (MI) नमवत विजयी मालिका सुरु ठेवली आहे. विशेष म्हणजे या विजयामुळे केकेआर गुणतालिकेतही थेट चौथ्या स्थानी पोहचली आहे. पहिल्या पर्वाच्या अखेरीस शेवटून दुसऱ्या स्थानावर असणारी केकेआर आता टॉप 4 मध्ये पोहोचली आहे.

मुंबई विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर मुंबईकडून सलामीवीर रोहित आणि डिकॉकने उत्तम सुरुवात केली. पण रोहित बाद होताच नंतरच्या फलंदाजाना खास कामगिरी करता आली नाही. केवळ डिकॉकने (55) अर्धशतक झळकावल्यामुळे मुंबई 155 धावांपर्यंत मजल मारु शकली. ज्यामुळे 156 धावांच सोपं टार्गेट केकेआरला मिळालं. केकेआरच्या संघाने युवा खेळाडू व्यंकटेश अय्यर (53) आणि राहुल त्रिपाठी (74) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर सोपा पण मोठा 7 गडी राखून विजय मिळवला.

सामन्यानंतर IPL 2021  गुणतालिका

मुंबई विरुद्ध केकेआर सामन्यानंतर गुणतालिकेचा विचार करता दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ 9 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्स 8 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह विराजमान आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी विराटचा आरसीबी संघ असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकले असून त्यांच्याकडे 10 गुण आहेत. ज्यानंतर मुंबईचा संघ होता पण केकेआर विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई 8 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर केकेआर नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानी आला आहे. केकेआरने मुंंबईप्रमाणेच 9 पैकी चारच सामने जिंकले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.363 असून मुंबईचा रनरेट -0.310 आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई सहाव्या स्थानी आहे.

सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

MI vs KKR: दिनेश कार्तिकसाठी मुंबईविरुद्धचा सामना ठरला खास, नवा रेकॉर्ड करत महान यष्टीरक्षक धोनीला सोडलं मागे

MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्येही ‘हिट’, कोणालाही न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

(After winning match against MI KKR goes on Number four at IPL 2021 point Table)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.