MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्येही ‘हिट’, कोणालाही न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामना सुरु असून मुंबईचे सलामीवीर रोहित आणि डीकॉक यांनी उत्तम सुरुवात करत मुंबईला चांगला स्कोर करुन दिला आहे.

MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्येही 'हिट', कोणालाही न जमलेला रेकॉर्ड केला नावावर
रोहित शर्मा

MI vs KKR: आयपीएल 2021 (IPL 2021) मधील 34 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी घडली आहे. चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला असताना संघाला कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) अनुपस्थिती फार महागात पडली होती. पण आजच्या सामन्यात रोहित फिट होऊन संघात आला आणि त्याने धडाकेबाज फलंदाजी करुन संघाला एक चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी त्याने एक मोठा रेकॉर्डही स्वत:च्या नावे केला आहे.

रोहितने केकेआरविरुद्ध 30 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. त्याने क्विंटन डिकॉकसोबत चांगली सुरुवात केली पण जादुई फिरकीपटू सुनील नारायणच्या (Sunil Narayan) चेंडूवर शर्मा झेलबाद झाला. सीमारेषेवर शुभमन गिलने त्याचा झेल घेतला. पण बाद होण्यापूर्वीच रोहितने एक मोठा रेकॉर्ड स्वत:च्या नावे केला आहे. त्याने केकेआर संघाविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध 1000 धावा करणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला आहे.

दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्त्वाचा

केकेआर आणि मुंबई इंडिन्स दोन्ही संघासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेचा विचार करता मुंबईचा संघ आतापर्यंत 8 सामने खेळला असून त्यातील 4 मध्येच विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे मुंबई 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर केकेआरच्या संघाने 8 पैकी 3 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात 6 गुण असून ते सहाव्या स्थानावरच आहेत. दरम्यान केकेआरचा रनरेट अधिक असल्याने आजचा सामना केकेआरने जिंकल्यास ते टॉप 4 मध्ये जातील तर मुंबईचा संघ पराभूत झाल्यास त्यांचे टॉप 4 मधील स्थान जाणार आहे.

हे ही वाचा

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

विराटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यामागे रवी शास्त्री, टी20 सह वनडेचं कर्णधारपद सोडण्याचीही केली होती मागणी

(Rohit sharma scored 1000 runs againt kkr in IPL most of any batsman against single team)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI