T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

आधी भारतात होणारा टी-20 विश्वचषक आता कोरोनाच्या संकटामुळे युएईमध्ये होणार आहे. 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 4:48 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकाची (ICC T20 World Cup 2021) उत्सुकता दिवसेंदिवस आणखीच शिगेला पोहचत आहे. आयपीएल सुरु असतानाही अनेक क्रिकेटप्रेमींना विश्वषकाचे वेध लागले आहेत. अशात ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी आयसीसीने (ICC) आगामी विश्वचषकाचं थीम साँग नुकतं लॉंच केलं आहे. 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेचं थीम साँग पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

या गाण्याला ‘Live The Game’ असं नाव देत आयसीसीने त्यांच्या सोशल मीडियावर हे गाणं पोस्ट केलं आहे. विशेष म्हणजे हे गाण मेड इन इंडिया आहे. भारताचा संगीतकार अमित त्रिवेदीने हे गाणं कंपोज केलं आहे. या गाण्यामध्ये मुख्य पात्रांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली, अफगानिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खान, वेस्टइंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल याचा अॅनिमेटेड अवतार दिसून येत आहे. तर या गाण्यावर तुम्हीही एक नजर फिरवाच…

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा-

T20 world Cup 2021 साठी भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वांचे संघ जाहीर, पाहा कोणते खेळाडू खेळणार एका क्लिकवर

T20 world Cup 2021: भारतीय संघाची घोषणा होताच इंग्लंडचा संघही जाहीर, बेन स्टोक्स नाहीच, पण तीन वर्षानंतर ‘या’ धाकड खेळाडूचे पुनरागमन

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(ICC t20 world cup theme song launched composed by amit trivedi see video)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.