विराटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यामागे रवी शास्त्री, टी20 सह वनडेचं कर्णधारपद सोडण्याचीही केली होती मागणी

विराट कोहली भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामानंतर विराट आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार असल्याचं त्याने सांगितलं.

विराटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यामागे रवी शास्त्री, टी20 सह वनडेचं कर्णधारपद सोडण्याचीही केली होती मागणी
विराट कोहली आणि रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 8:25 PM

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 16 सप्टेंबर रोजी भारतीय टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. टी -20 विश्वचषकानंतर तो कर्णधारपदावरून पायउतार होईल. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. कोहलीच्या अशा अचानक केलेल्या घोषणेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नुकत्या समोर आलेल्या एका माहितीनुसार विराटला हा सल्ला मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिला होता. विशेष म्हणजे शास्त्रींनी विराटला मर्याजित षटकांच्या दोन्ही कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याचंही समोर आलं आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनं याबद्दलची माहिती दिली आहे. त्याने सांगितलं, ”रवी शास्त्री आणि कोहली यांच्या कर्णधारपदाबाबत काही महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती. यावेळी विराटने त्याच्या खेळावर अर्थात फलंदाजीवर अधिक लक्ष्य देण्यासाठी त्याने मर्यादीत सामन्यांच्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा असं शास्त्रींनी सांगितलं होतं. त्यानंतर आता जाऊन विराटने टी20 संघाची कर्णधारी सोडली आहे.” कोहलीने टी20 संघाच कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याने एकदिवसीय संघाचं कर्णधारपद अजूनही सोडलेलं नाही.

2017 मध्ये कोहली कर्णधार बनला

महेंद्रसिंग धोनीच्या जागी कोहली 2017 मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनला. कोहलीने 90 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 28 अर्धशतकांसह 3159 धावा केल्या आहेत. त्याने यापैकी 45 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 27 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलाय तर 14 सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच्या विजयाची टक्केवारी 65.11 आहे. टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कर्णधार म्हणून त्याच्या शेवटच्या स्पर्धेत, कोहलीवर ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रचंड दबाव असेल.

अशी पोस्ट लिहित कोहलीने दिला होता राजीनामा

मी तसा पुरेसा नशिबवान आहे की, मला फक्त भारताचं प्रतिनिधीत्वच करायला मिळालं असं नाही तर टीम इंडियाला पूर्ण क्षमतेसह लीडही करता आलं. भारताचा कर्णधार होण्यापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी मला सपोर्ट केला त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मला हे करता येणं शक्य नव्हतं. त्या प्रत्येकाचे म्हणजे टीममधले सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे कोचेस, तसच प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीचे ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार.

वर्कलोड समजणं ही एक महत्वाची बाब आहे. गेल्या 8-9 वर्षापासून तीनही फॉरमॅटमध्ये खेळणं तसेच सातत्यानं 5-6 वर्षापासून कॅप्टन्सी करणं हा अती वर्कलोड आहे. याच पार्श्वभूमीवर मला आता असं वाटतं की टीम इंडियाला वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण क्षमतेनं लीड करण्यासाठी मी स्वत:ला स्पेस देणं गरजेचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून मी टी-20 क्रिकेटला सर्व काही दिलंय आणि पुढेही फलंदाज म्हणून देत राहीन.

अर्थातच, या निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप वेळ घेतला. माझ्या जवळच्या लोकांशी यावर सविस्तर चर्चा केली. रवी भाई (रवी शास्त्री) आणि रोहित शर्मा यांच्याशी बोललो. हे दोघेही नेतृत्त्वाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्याशी बोलून मी दुबईत होत असलेल्या टी-20 विश्वचषकानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मी बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही या विषयावर चर्चा केली. यापुढेही मी माझ्या पूर्ण क्षमतेने भारतीय क्रिकेट आणि भारतीय टीमची सेवा करत राहीन.

हे ही वाचा

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

IPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय

(For better batting ravi shastri suggested Virat Kohli to resign from captaincy)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.