AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : चिंता वाढली, आशिया कप दरम्यान टीम इंडियाच्या एका प्रमुख खेळाडूची दुखापत बळावली

World Cup 2023 : पाकिस्तान विरुद्ध मॅचच्या काहीवेळ आधी या प्लेयरलने त्रास होत असल्याच सांगितलं. या प्लेयरच्या दुखापतीच्या टायमिंगवरुनही संशय निर्माण होतोय. टीम इंडियातील सर्व खेळाडू खरच वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहेत का?.

World Cup 2023 : चिंता वाढली, आशिया कप दरम्यान टीम इंडियाच्या एका प्रमुख खेळाडूची दुखापत बळावली
team india
| Updated on: Sep 11, 2023 | 8:57 AM
Share

कोलंबो : वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळण्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू पूर्णपणे फिट आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये पूर्ण क्षमतेने खेळणार असं वाटत असतानाच पुन्हा दुखापतीने डोक वर काढलं आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या कुठल्या खेळाडूला दुखापत होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात आली. जे दुखापतग्रस्त होते, त्यांना फिट होण्यासाठी पुरेसा वेळ दिला. मात्र, तरीही पुन्हा एकदा दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होते. पण त्यांनी त्यांचा फिटनेस मिळवला, म्हणून आशिया कपच्या टीममध्ये त्यांची निवड करण्यात आलीय पण पुन्हा एकदा दुखापतीच्या समस्येने डोक वर काढलं आहे. पाठदुखीमुळे टीम बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने पाच महिन्यानंतर टीममध्ये कमबॅक केलं होतं.

पण श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापत झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला अय्यरची पाठदुखी पुन्हा बळावली आहे. त्यामुळे आशिया कप टुर्नामेंटमध्ये सुपर 4 राऊंडमधील महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाहीय. “श्रेयसला पाठदुखीचा त्रास जाणवल्याने त्याच्याजागी केएल राहुलची निवड केली” असं रोहित शर्माने रविवारी टॉसच्यावेळी सांगितलं. भारतीय क्रिकेट टीम वर्षभरापासून दुखापतीचा सामना करत आहे. आशिया कपमध्ये टीम इंडिया पूर्ण क्षमतेने खेळतेय. सर्व खेळाडू फिट आहेत, असं वाटत होतं. श्रेयस अय्यर टीमच्या रणनितीचा महत्त्वाचा भाग आहे. तो 4 नंबरवर बॅटिंगला येणार होता. पण तो खेळू शकला नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीच्या टायमिंगमुळे संशय

सामन्याआधी तयारी सुरु असताना शेवटच्या क्षणी श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीची कल्पना दिली. मूळ प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यर 4 नंबरवर बॅटिंग करणार होता. पण अखेरीस केएल राहुलची निवड करावी लागली. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी सुद्धा श्रेयस अय्यरच्या फिटनेसवरुन प्रश्न उपस्थित केलाय. श्रेयस अय्यरच्या दुखापतीच्या टायमिंगवरुनही संशय निर्माण होतोय. कारण केएल राहुल खेळण्यासाठी फिट होता. इशान किशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रेयस अय्यरच एक प्लेयर होता, ज्याला बेंचवर बसवलं जाऊ शकत होतं. योगायोगाने आता दुखापतीच कारण पुढे आलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.