AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघाची बांधणी सुरू आहे. एकीकडे, या संघात स्थान पक्कं करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली संघर्ष करत आहे. दुसरीकडे एका दिग्गज खेळाडूचं या स्पर्धेत खेळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?Image Credit source: David Davies/PA Images via Getty Images
| Updated on: Jul 16, 2026 | 5:20 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून वर्षभराचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यासाठी संघाची बांधणी आतापासून केली जात आहे. प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स आणि दक्षिण अफ्रिकेतील वातावरण या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजाबाबत एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत त्याचं खेळणं कठीण आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या नावाचा देखील विचार करत नाही. वनडे फॉर्मेटसाठी रवींद्र जडेजा निवडकर्त्यांच्या यादीत नाही, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. संघ व्यवस्थापनाला संघात टॉप 7 मध्ये फलंदाजी करेल अशा खेळाडूच्या शोधात आहेत. दक्षिण अफ्रिकेतील स्थिती पाहता संघ व्यवस्थापन मध्यम पेसर्स आणि अष्टपैलू खेळाडूला पसंती देऊ शकते. तर फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आधीच संघात आहे.

अक्षर पटेल रवींद्र जडेजापेक्षा भारी!

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाची गोलंदाजी व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये मागच्या वर्षात हवी तशी नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याला संधी दिली गेली. कारण तिथली खेळपट्टी त्याच्या गोलंदाजीला पूरक होती. दुसरीकडे, त्याच्या फलंदाजीतही आता पूर्वीसारखा दम राहिला नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याच्या जागी अक्षर पटेलची निवड केली गेली आहे. रिपोर्टनुसार, संघ व्यवस्थापन दक्षिण अफ्रिकेत प्लेइंग 11मध्ये एक मुख्य फिरकीपटू ठेवणार आहे. हर्ष दुबेला अक्षर पटेलाचा बॅकअप म्हणून तयार केलं जात आहे.

रवींद्र जडेजाचं करिअर संपलं का?

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रवींद्र जडेजा शेवटचा वनडे सामना खेळला होता. हा सामना इंदुरमध्ये खेळला गेला होता. त्यात त्याने फलंदाजी करताना फक्त 12 धावा केल्या होत्या. तसेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत फक्त 43 धावा करू शकला होता. जडेजाने 210 वनडे सामन्यात 232 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, अक्षर पटेल या फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने 72 वनडे सामन्यात 79 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 4.5 प्रति षटक आहे. तर वनडेतील 50 डावात 24.72 च्या सरासरीने 915 धावा केल्या आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान