AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनायाने याबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. पण एक अट पूर्ण केल्यानंतरच क्रिकेटच्या मैदानात उतरता येणार आहे. नेमकं काय ते जाणून घ्या.

अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर...
अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर...Image Credit source: INSTAGRAM
| Updated on: Aug 26, 2026 | 6:50 PM
Share

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलीची क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. तीन वर्षांपूर्वी आर्यन ते अनाया असा बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास तयार आहे. खरं तर तिला घरातूनच क्रिकेटचं बाळकडू मिळालं होतं. लिंग बदल करण्यापूर्वी अनाया मुंबईत क्रिकेट खेळली आहे. सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेटचे धडे गिरवले आहे. इंग्लंडमध्ये स्थानिक काउंटी क्लबसाठी क्रिकेट खेळली आहे. पण लिंग बदल केला आणि क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम लागला. अनाया बांगरला क्रिकेटवर प्रेम आहे, यात काही दुमत नाही. पण आयसीसी नियम आणि बीसीसीआयचं स्पष्ट धोरण नसल्याने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं. आता अनाया बांगर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे. कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र एक अट पूर्ण गरजेचं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची अट आहे तरी काय?

ऑस्ट्रेलियामध्ये स्थानिक किंवा व्यावसायिक महिला क्रिकेट खेळण्यासाठी ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी कठोर नियम आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 महिन्यात 10 नॅनोमोल प्रति लीटर पेक्षा कमी करणे बंधनकारक आहे. टेस्टोस्टेरॉन म्हणजे पुरूष संप्रेरक किंवा हार्मोन पातळी.. कारण पुरूषाच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असते. त्यामुळे शारीरिक ताकद महिलांच्या तुलनेत अधिक असते.  महिला क्रिकेटमध्ये समान न्याय मिळावा यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा नियम ठेवला आहे.

अनाया बांगरला आता काय करावं लागेल?

अनाया बांगरला 12 महिने म्हणजेच एक वर्षे शरीरातील टेस्टोस्टेरॉन पातळी कमी करण्यासाठी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू ठेवावी लागेल. तिला दर महिन्याला रक्त चाचण्या करून रिपोर्ट वैद्यकीय पॅनेलकडे जमा करावे लागेल. जर एकाही महिन्यात ही पातळी वाढली, तर तिचा 12 महिन्यांचा कालावधी पुन्हा सुरुवातीपासून मोजला जाईल. 12 महिन्यात हार्मोन बदलांमुळे तिच्या शरीरातील स्नायूंची ताकद आणि स्टॅमिना कमी होईल. त्यामुळे फिट अँड फाईन राहण्यासाठी तिला विशेष सराव करावा लागेल. 12 महिने यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सर्व वैद्यकीय पुरावे सादर करून तिला खेळता येईल. पण ट्रान्सजेंडर खेळाडूंना पुढे खेळत राहण्यासाठी फक्त एकदाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत ही पातळी नेहमी मर्यादेच्या आतच ठेवावी लागणार आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे