AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रसेल-नरेनची घमेंड मोडली, शेवटच्या चेंडूवर SIX मारला, पण….

दोघांची घमेंड मोडलीच. पण रसेल-नरेनच्या बालिश चुकीचा टीमला असा बसला फटका.

रसेल-नरेनची घमेंड मोडली, शेवटच्या चेंडूवर SIX मारला, पण....
andre-russelImage Credit source: instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 6:13 PM
Share

मुंबई: आंद्रे रसेल आणि सुनील नरेन ही वेस्ट इंडिज क्रिकेटमधली मोठी नावं. दोघेही आक्रमक फलंदाज. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेले हे खेळाडू. हे दोघे विकेटवर असताना मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दोघे लास्ट ओव्हरपर्यंत क्रीजवर होते. मात्र, तरीही टीमचा पराभव झाला. ट्रिनबॅगो नाइट रायडर्सचा सेंट लुसिया किंग्सकडून अवघ्या 1 रन्सने पराभव झाला.

सीपीएलमधील ही 23 वी मॅच होती. सेंट लुसिया किंग्सने अवघ्या 147 धावा केल्या होत्या. पण ट्रिनबॅगो नाइट रायडर्सला हा सामना जिंकता आला नाही. रसेल आणि नरेनमधील रनिंग बिटविन द विकेट या पराभवाला कारण आहे.

सेंट लुसियाचा रोमांचक विजय

या मॅचमध्ये सेंट लुसियाचा विजय निश्चित वाटत होता. ट्रिनबॅगो नाइट रायडर्सला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता होती. रोशन प्राइमसच्या हातात चेंडू होता. त्याने पहिल्या तीन चेंडूत फक्त 4 धावा दिल्या. शेवटच्या 3 चेंडूत ट्रिनबॅगोला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला, पण

प्राइमसच्या चौथ्या चेंडूवर रसेलने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर रसेलने सिक्स मारला. शेवटच्या चेंडूवर ट्रिनबॅगोला 7 धावांची गरज होती. रसेलने सिक्स मारला. हा षटकार मारुनही ट्रिनबॅगोची टीम 1 रन्सने हरली.

मग टीम कशी हरली?

तुम्ही म्हणाला रसेल इतकी चांगली फलंदाजी केली, मग टीम कशी हरली? खरंतर रसेल आणि नरेनची रनिंग बिटविन द विकेट खूपच खराब होती. दोघांनी पळून 2-2 धावा काढण्याची संधी वाया दवडली. अखेर टीमला त्याची किंमत एक रन्सच्या पराभवाने चुकवावी लागली.

Follow Us
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.