AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणने दिली भारताला साथ, थेट इंधन व्यापाराला सुरूवात, एलपीजी गॅस..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात जग टेन्शनमध्ये होते. अनेक मोठे हल्ले केले गेले. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे नाकेनऊ आली. त्यामध्येच आता इराण आणि भारताने मोठा निर्णय घेतला आहे.

इराणने दिली भारताला साथ, थेट इंधन व्यापाराला सुरूवात, एलपीजी गॅस..
Iran and India fuel trade
| Updated on: Mar 27, 2026 | 11:21 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. 6 एप्रिलपर्यंत अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली. इराण आणि अमेरिका युद्धाला सुरूवात झाल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. या तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्याकरिता रशियासोबतच इराणवर लावलेले निर्बंध अमेरिकेने 30 दिवसांकरिता उठवले. काही वर्षांपासून अमेरिकेने इराणच्या तेलावर आणि गॅसवर काही निर्बंध लावले. त्यापूर्वी भारत आणि इराण यांच्यात इंधन व्यापार होत पण अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनंतर व्यापार ठप्प झाला होता. अमेरिका या युद्धात मागे पडली आहे. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने अमेरिकेवरील दबाव वाढला. शिवाय अनेक देश युद्धात भरडली जात आहेत. आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. अमेरिकेने युद्धाची आपल्याला कल्पना दिली नसल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी थेटपणे काही देशांना मदत मागितली. पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही.

दुसरीकडे रशिया आणि चीन इराणच्या मदतीला जाहीरपणे येताना दिसले. इराणने स्पष्ट शब्दात म्हटले होते की, चीन आणि रशिया आम्हाला मदत करत असून आम्ही त्यांचे आभारी आहोत. इराणचे सर्वाेच्च नेते हल्ल्यात ठार झाल्यानंतर इराण युद्धात काहीच करणार नाही, असा अंदाज अमेरिकेचा होता. पण प्रत्यक्षात सर्वकाही उलटे झाल्याचे बघायला मिळाले.

भारत आणि इराण चांगले मित्र आहेत. होर्मुज खाडी बंद असतानाही इराणकडून भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता दिला जात होता. त्यामध्येच त्यांनी जाहीर केले की, होर्मुज खाडी भारतासाठी खुली आहे, त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. आता एक अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. जगाला पुन्हा एकदा भारत आणि इराणची मैत्री दिसली आहे.

इराण आणि भारतात पुन्हा एकदा इंधन व्यापार झाल्याचे बघायला मिळत आहे. इराणचे पहिले एलपीजीचे जहाज या आठवड्यात भारतात येणार आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा असताना इराण भारताच्या मदतीला आला आहे. काही वर्षानंतर भारत आणि इराणमध्ये इंधन व्यापार होत आहे. याच आठवड्यात इराणचे जहाज एलपीजी गॅस घेऊन भारतात दाखल होईल.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!