
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात प्रतिष्ठेची एशेज सीरिज खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सलग 3 सामन्यात धुव्वा उडवून ही मालिका आपल्या नावावर केली आहे. कांगारुंनी अवघ्या 11 दिवसांत इंग्लंडला ढेर करत ही मालिका जिंकली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडसमोर लाज राखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे इंग्लंड विजयाचं खातं उघडणार की ऑस्ट्रेलिया सलग चौथा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांची चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र अद्याप प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केलेली नाही. हा चौथा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न इथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होईल. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
बेन स्टोक्स हाच चौथ्या कसोटीतही इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. स्टोक्ससमोर इंग्लंडला विजयी करण्याचं आव्हान असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा कर्णधार बदलला आहे. स्टीव्हन स्मिथ याने पहिल्या 2 सामन्यात नेतृत्व केलं होतं. तर पॅट कमिन्स याने तिसऱ्या सामन्यात नेतृत्वाची धुरा स्वीकारली. मात्र क्रिकेट बोर्डाने भविष्यातील योजनेनुसार पॅटला उर्वरित मालिकेतून विश्रांती दिली आहे. त्यामुळे पॅटच्या जागी आता पुन्हा एकदा स्टीव्हन स्मिथ हाच कांगारुंचं नेतृत्व करणार आहे.