AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Test Championship final 2021 : एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही, आशिष नेहरा भडकला

ICC World Test Championship final 2021 : एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही किंबहुना संघातून वगळू शकत नाही", अशा शब्दात नेहराने निवड समितीवर टीका केली. (Ashish Nehra Slam Selecter over Prithvi Shaw)

World Test Championship final 2021 : एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही, आशिष नेहरा भडकला
ऐन फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ला संघात का स्थान देण्यात आलं नाही?, असा थेट सवाल नेहराने विचारला आहे.
| Updated on: May 16, 2021 | 7:08 AM
Share

मुंबईवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात धडाकेबाज बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi shaw) ला स्थान देण्यात आलेलं नाहीय. यावरुन बरीच चर्चा होतीय. अशातच भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज आशिष नेहराने (Ashish Nehra) निवड समितीवर टीकास्त्र सोडलंय. ऐन फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ला संघात का स्थान देण्यात आलं नाही?, असा थेट सवाल नेहराने विचारला आहे. (Ashish Nehra Slam Selecter over Prithvi Shaw not Selected ICC World Test Championship final 2021 India vs England)

एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही

“बॅटिंग तंत्राच्या मुद्द्यावर बोलायचं म्हटल्यास वाद प्रतिवाद होऊ शकतात. कधीकधी बॅट्समनला नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेडमध्ये पृथ्वी शॉ जवळ 30-40 कसोटी सामन्यांचा अनुभव नव्हता. तो युवा खेळाडू होता. त्याची सुरुवात होती. एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही किंबहुना संघातून वगळू शकत नाही”, अशा शब्दात नेहराने निवड समितीवर टीका केली.

“भलेही भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिरीज जिंकण्यासाठी जिवाचं रान करत होता. परंतु पृथ्वीच्या एका सामन्याच्या अपयशानंतर त्याला बेंचवर बसवणं किती योग्य आहे?”, असा सवाल नेहराने विचारला. पृथ्वीला भारतीय संघातून वगळल्यानंतर त्याने क्रिकबजशी बोलताना निवड समितीवर टीका केली.

“आयपीएलच्या 13 व्या मोसमात देखील त्याला खाली बसवायला नको होतं, जरी त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. टी ट्वेन्टीबाबत बोलायचं झालं तर मी नेहमी अशा खेळाडूला सपोर्ट करेल ज्याच्याजवळ क्षमता आणि प्रतिभा आहे. टी ट्वेन्टीमध्ये रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस यांसारख्या खेळाडूंची गरज असते”, असंही नेहरा म्हणाला.

पृथ्वी शॉ ची जबरदस्त कामगिरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉ ची बॅट बोलली नाही, त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. परंतु ऑस्ट्रेलियावरुन आल्यानंतर अंगात जशी जादू संचारावी तशी पृथ्वीच्या बॅटमधून धावांची बरसात झाली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 827 रन्स फटकावल्या तसंच मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. याशिवाय आयपीएलमध्येही पृथ्वीने कमाल केली. त्याने 7 सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने 308 धावा केल्या.

(Ashish Nehra Slam Selecter over Prithvi Shaw not Selected ICC World Test Championship final 2021 India vs England)

हे ही वाचा :

विराट अनुष्काच्या कोरोनाविरोधी अभियानाला लोकांची साथ, 24 तासांत जमली बक्कळ रक्कम!

मायदेशी जाण्याची लगबग सुरु होती, पण आता भारतातच मुक्काम, न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण!

Video : क्रिकेटमधला पहिला ओरिजनल मॅच फिनिशर, त्याच्या खास स्टाईलमध्ये संपवायचा मॅच!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.