जय शाह यांच्याशी PCB अध्यक्ष उद्धटपणे बोलले, बैठकीतील INSIDE स्टोरी आली समोर

. शनिवारी आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत काय घडलं? वातावरण कसं तापलं होतं? त्याचा तपशील समोर आलाय.

जय शाह यांच्याशी PCB अध्यक्ष उद्धटपणे बोलले, बैठकीतील INSIDE स्टोरी आली समोर
najam sethi-jay shahImage Credit source: pcb/bcci
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 8:37 AM

Asia CUP 2023 : आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन BCCI आणि PCB मध्ये खटके उडाले आहेत. पाकिस्तानात ही स्पर्धा होणार असेल, तर आम्ही सहभागी होणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलय. त्यामुळे पाकिस्तानचा चांगला तिळपापड झालाय. शनिवारी आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत काय घडलं? वातावरण कसं तापलं होतं? त्याचा तपशील समोर आलाय. आशिया क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शाह आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांच्यात स्पर्धा आयोजनाबाबत चर्चा झाली. पण त्यात मित्रत्वाची भावना कुठेही नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

कुठे होणार स्पर्धा?

या दोघांमध्ये चर्चा सुरु असताना, वातावरण तापलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानात ही स्पर्धा होणार नाही, हे निश्चित आहे. त्याऐवजी यूएईमध्ये स्पर्धा आयोजित होईल, असं सूत्रांनी सांगितलं. मार्चमध्ये याबद्दल औपचारिक घोषणा होईल.

जय शाह शांत होते

BCCI ने भूमिका स्पष्ट केल्यानंतर आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत वातावरण तापलं होतं. PCB चे विद्यमान प्रमुख नजम सेठी जय शाह यांच्यासोबत उद्धटपणे बोलले, वागले असं सूत्राने सांगितलं. भारत येणार नसेल, तर पाकिस्तानही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, असं नजम सेठी म्हणाले. त्यावर जय शाह यांनी, त्यांना शांतपणे ICC आणि ACC स्पर्धांची सरमिसळ करु नका असं सांगितलं. आशियाई क्रिकेट काऊन्सिलमधील सूत्राच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. कुठल्याही निर्णयाविना संपली

आशिया कपसाठी वेन्यू निश्चित करण्याची डेडलाइन मार्च आहे. पुढच्या महिन्यात एक्ज्यूकिटिव बोर्डाच्या मीटिंगमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल. बहरीनमध्ये झालेली एशियन क्रिकेट काऊन्सिलची बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. आशिया कप 2023 स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने पाकिस्तानात येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या यजमानपदावर टांगती तलवार आहे.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.