AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs IND Head To Head | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया पुन्हा हायव्होल्टेज सामना, आकडे कोणाचे भारी?

India vs Pakistan Head To Head Records | पाकिस्तान आणि टीम इंडिया, 2 कट्टर चीर प्रतिद्वंदी हे रविवारी आमनेसामने आहेत. या दोन्ही टीमपैकी आकड्यांच्या बाबतीत कोण सरस आणि कोण कमजोर आहे? आकडे पाहा आणि जाणून घ्या.

PAK vs IND Head To Head | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया पुन्हा हायव्होल्टेज सामना, आकडे कोणाचे भारी?
| Updated on: Sep 10, 2023 | 1:24 AM
Share

कोलंबो | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीनंतर हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 4 मध्ये रविवारी 10 सप्टेंबर रोजी दोन हात करणार आहेत. हिटमॅन रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणार आहे. तर बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. हा सुपर संडेचा सुपर सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.  या हायव्होल्टेज मॅचला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

हेड टु हेड आकडेवारीत वरचढ कोण?

टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात पहिली वनडे मॅच ही 1978 साली खेळवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात एकूण 133 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने 72 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडिया 55 सामने जिंकली आहे. तर 5 सामन्यांचा निकालच लागू शकला नाही. तर पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या 10 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे.

टीम इंडियाने 10 पैकी 7 वेळा बाजी मारली. तर पाकिस्तानला फक्त 2 मॅचच जिंकता आल्यात. तर रद्द झालेला एकमेव सामना हा आशिया कप 2023 साखळी फेरीतील आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी पावसाच्या व्यत्यामुळे रद्द करण्यात आला.

आशिया कपमधील रेकॉर्ड काय सांगतो?

आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. पाकिस्ता-टीम इंडिया यांच्यात आशिया कप स्पर्धेत एकूण 14 50 ओव्हरच्या सामने झाले आहेत. इथे टीम इंडियाने 7 वेळा विजयी झेंडा फडकवलाय. तर पाकिस्तानने 5 वेळा मैदान मारलंय. मात्र टीम इंडियाला याच मैदानात 2004 मध्ये पाकिस्तानने 59 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचा सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.