AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs HK : 11 वर्षांनंतर अखेर पराभवाची परतफेड, बांगलादेशची विजयी सुरुवात, हाँगकाँगचा हिशोब बरोबर

Bangladesh vs Hong Kong Match Result : बांगलादेशने हाँगकाँगवर 7 विकेट्सने विजय मिळवत 11 वर्षांपूर्वीच्या पराभवाची अचूक परतफेड केली. लिटन दास याने बांगलादेशच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

BAN vs HK : 11 वर्षांनंतर अखेर पराभवाची परतफेड, बांगलादेशची विजयी सुरुवात, हाँगकाँगचा हिशोब बरोबर
Bangladesh Captain Litton DasImage Credit source: @BCBtigers X Account
| Updated on: Sep 12, 2025 | 1:43 AM
Share

बांगलादेश क्रिकेट टीमने अफगाणिस्तान, टीम इंडियानंतर आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. आशिया कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगवर 7 विकेट्सने मात केली. हाँगकाँगने बागंलादेशसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 14 बॉलआधी आणि 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बांगलादेशने 17.4 ओव्हरमध्ये 144 धावा केल्या आणि विजय मिळवला. बांगलादेशच्या या विजयात कॅप्टन लिटन दास याने प्रमुख भूमिका बजावली. लिटन दास याने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर तॉहिद हृदॉय याने लिटनला चांगली साथ दिली.

बांगलादेशची बॅटिंग

बांगलादेशची विजयी धावांचा पाठलाग करता ठिकठाक सुरुवात झाली. मात्र हाँगकाँगने बांगलादेशला ठराविक अंतराने 2 झटके दिले. परवेझ इमोन 19 आणि तांझिज तमिम याने 14 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे बांगलादेशचा स्कोअर 2 आऊट 47 असा झाला. त्यानंतर लिटन दास आणि तॉहिद हृदॉय या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. हाँगकाँगने या भागीदारी दरम्यान जोडीला चांगलाच घाम फोडला. मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही. बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर असताना लिटन आणि तॉहिद ही जोडी हाँगकाँगने फोडली. लिटन आऊट झाला.

लिटन दास याने 39 बॉलमध्ये 151.28 च्या स्ट्राईक रेटने 59 रन्स केल्या. लिटनने या खेळीत 1 सिक्स आणि 6 फोर लगावले. त्यानंतर तॉहिदने उर्वरित 2 धावा करुन बांगलादेशला विजयी केलं. तॉहिदने 36 बॉलमध्ये 1 फोरसह नॉट आऊट 35 रन्स केल्या. हाँगकाँगसाठी आतिक इक्बाल याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आयुष शुक्ला याने 1 विकेट मिळवली.

बांगलादेशकडून पराभवाची परतफेड

बांगलादेशने या विजयासह 11 वर्षांपूर्वीचा एक हिशोब बरोबर केला. बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग या दोन्ही संघांची टी 20i क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी दोन्ही संघ 11 वर्षांपूर्वी टी 20i वर्ल्ड कप 2014 या स्पर्धेत भिडले होते. तेव्हा हाँगकाँगने बांगलादेशवर 2 विकेट्सने विजय मिळवत मोठा अपसेट केला होता. बांगलादेशने त्यानंतर अखेर विजय मिळवत त्या पराभवाची परतफेड केली.

बांगलादेशची विजयी सुरुवात

दरम्यान हाँगकाँगचा या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं. हाँगकाँगचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग दुसरा पराभव ठरला. हाँगकाँगचा या साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 15 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.