Asia cup 2025 IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार?

Asia cup 2025 India vs Pakistan Final Live Streaming: आशिया कप 2025 स्पर्धेत सलग 6 सामने जिंकणारी टीम इंडिया अंतिम फेरीत पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांची या स्पर्धेत आमेनसामने येण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. जाणून घ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Asia cup 2025 IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार?
India vs Pakistan Final Live Streaming
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 27, 2025 | 5:23 PM

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात जे याआधी कधीच झालं नाही ते यंदा पहिल्यांदाच होणार आहे. या स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्यांदाच भिडणार आहेत. आशिया कप 2025 ची ट्रॉफी उंचावण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानला टीम इंडियासारखी कामगिरी करणं जमलेलं नाही. मात्र त्यानंतरही सामन्यात कधी काय होईल सांगता येत नाही. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी हे दोन्ही संघ साखळी आणि सुपर 4 फेरीत आमनेसामने होते. टीम इंडियाने दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. हा महाअंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना रविवारी 28 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल. तसेच https://www.tv9marathi.com/ या वेबसाईटवरुन सामन्याबाबत प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.

भारत सर्वात यशस्वी संघ

दरम्यान भारत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. यंदा आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्याचं करण्याची 17 वी वेळ आहे. याआधीच्या 16 पैकी 8 वेळा भारताने आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडिया गतविजेताही आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे सलग दुसऱ्यांदा आणि एकूण नवव्यांदा आशिया चॅम्पियन्स होण्याची संधी आहे. तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तानला फक्त 2 वेळाच आशिया कप जिंकता आला आहे. पाकिस्तानने 2000 नंतर 2012 साली शेवटची आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून पाकिस्तानची 13 वर्षांची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर ही प्रतिक्षा संपवण्याचं आव्हान आहे.