IND vs PAK Final : टीम इंडियात 2 बदल फिक्स! पाकिस्तान विरुद्ध मॅचविनर बॉलरची एन्ट्री निश्चित, कशी असेल Playing 11?
Asia Cup 2025 Final Team India Probable Playing 11 Against Pakistan: टीम इंडिया आशिया कप जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. आशिया चॅम्पियन होण्यासाठी अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.या महाअंतिम सामन्यासाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात शुक्रवारी 26 सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेने पाथुम निसांका याच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 203 धावांचा अप्रतिम पाठलाग केला. मात्र शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज असताना श्रीलंकेला 2 धावाच करता आल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्याचा निकाल लागण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. टीम इंडियाने शनिवारी 27 सप्टेंबरला सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विजय मिळवला. भारताने यासह या स्पर्धेत सलग सहावा विजय साकारला.
अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले असल्याने टीम इंडिया आणि श्रीलंकेसाठी हा सामना औपचारिकताच होता. आता रविवारी 28 सप्टेंबरला आशिया कप कोण जिंकणार? याचा निकाल लागणार आहे. अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या 11 खेळाडूंना संधी मिळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
2 बदल निश्चित!
अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असल्याने टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 2 बदल केले होते. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती दिली होती. तर अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना संधी दिली होती.
जसप्रीत बुमराहचं कमबॅक निश्चित
बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे बुमराह अंतिम सामन्यात खेळणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. मात्र टीम मॅनेजमेंट शिवम दुबेला पुन्हा संधी देणार की गोलंदाजीला बळकटी मिळवून देण्यासाठी अर्शदीपला कायम ठेवणार? याबाबत अनिश्चितता आहे. कारण शिवमला या स्पर्धेत ऑलराउंडर म्हणून काही खास करता आलेलं नाही. तर अर्शदीपने बॉलिंगने छाप सोडली आहे.त्यामुळे आता कॅप्टन सूर्या शिवमवर विश्वास दाखवत पुन्हा संधी देणार की अर्शदीपला कायम ठेवणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
