Asia Cup 2025: अभिषेक शर्माची कडक ‘ओपनिंग’, स्फोटक खेळीसह मोठा रेकॉर्ड ब्रेक, विराट-रिझवानला पछाडलं
Abhishek Sharma Asia Cup 2025 : अभिषेक शर्मा याने आपल्या पहिल्याच टी 20i आशिया कप स्पर्धेत ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामगिरी करत विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. जाणून घ्या अभिषेकने नक्की कोणता विक्रम मोडीत काढलाय जाणून घ्या.

टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाज आणि युवराज सिंह याचा शिष्य अभिषेक शर्मा याने टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत पाचही सामन्यात 30 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अभिषेकने श्रीलंकेविरुद्ध हाच तडाखा कायम ठेवत अर्धशतक ठोकलं. अभिषेकने यासह सुपर 4 मध्ये अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. अभिषेकने याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. अभिषेकने श्रीलंकेविरुद्ध 61 धावांची खेळी केली. अभिषेकने या खेळीदरम्यान इतिहास घडवला. अभिषेकने या खेळीसह टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान यांना मागे टाकत रेकॉर्ड ब्रेक केला. अभिषेकने नक्की कोणता विक्रम मोडीत काढलाय हे सविस्तर जाणून घेऊयात.
अभिषेकची ऐतिहासिक कामिगरी
अभिषेकने श्रीलंकेविरुद्ध 34 धावा पूर्ण करताचा मोठा विक्रम केला. अभिषेक यासह एका टी 20i आशिया कप स्पर्धेच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अभिषेकने यासह टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान या दोघांना मागे टाकत ही कामगिरी केली. अभिषेकने 34 धावांसह या स्पर्धेत 282 रन्स केल्या.
अभिषेकआधी मोहम्मद रिझवानच्या नावावर हा विक्रम होता. रिझवानने 2022 साली टी 20 आशिया कप स्पर्धेत एकूण 281 धावा केल्या होत्या. तर विराटने तेव्हाच 276 धावा केल्या होत्या. मात्र अभिषेकने एका झटक्यात या 2 अनुभवी खेळाडूंना मागे टाकत आपला दबदबा निर्माण केला.
रोहित-विराटच्या ग्रुपमध्ये धडक
तसेच अभिषेकने या खेळी दरम्यान आणखी एक खास कामगिरी केली. अभिषेक एका टी 20 स्पर्धेत टीम इंडियासाठी 250 पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने अशी कामगिरी केली होती. तसेच अभिषेक एका टी 20i आशिया कप स्पर्धेत 300 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
दरम्यान आता टीम इंडिया अंतिम फेरीत रविवारी 28 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात अशीच स्फोटक खेळी करत अभिषेक शर्मा याला आपला रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याची संधी आहे. अभिषेकने सुपर 4 फेरीत अर्धशतकांची हॅटट्रिक केली. मात्र त्याला शतक करता आलं नाही. त्यामुळे अभिषेकने ही उणीव अंतिम फेरीत पूर्ण करत शतक करावं आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करावी, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
