AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs HK : हाँगकाँगने घाम फोडला, 150 रन्स चेज करताना श्रीलंकेच्या नाकी नऊ, अवघ्या 7 बॉलआधी विजय

Asia Cup 2025 Sri Lanka vs Hong Kong Match Result : यासिम मुर्तझा याच्या नेतृत्वात नवख्या हाँगकाँगने अनुभवी श्रीलंका क्रिकेट संघाला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. हाँगकाँगचा पराभव झाल्याने ते या मोहिमेचा शेवट गोड करु शकले नाहीत. मात्र त्यांनी श्रीलंकेला झुंजवत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

SL vs HK : हाँगकाँगने घाम फोडला, 150 रन्स चेज करताना श्रीलंकेच्या नाकी नऊ, अवघ्या 7 बॉलआधी विजय
Sri Lanka vs Hong KongImage Credit source: Icc X account
| Updated on: Sep 16, 2025 | 2:07 AM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील आठव्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना 2 संघांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. दुबईत झालेल्या या सामन्यात हाँगकाँगने अनुभवी श्रीलंका टीमला चांगलाच घाम फोडला. श्रीलंकेने हा सामना जिंकला. मात्र हाँगकाँगने श्रीलंकेच्या नाकी नऊ आणले. हाँगकाँगने श्रीलंकेला चांगलंच झुंजवलं. हाँगकाँगने श्रीलंकेला सहजासहजी विजय मिळवून दिला नाही. हाँगकाँगने श्रीलंकेसमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 6 विकेट्स गमावून अवघ्या 7 बॉलआधी पूर्ण केलं. श्रीलंकेला विजयासाठी 18.5 ओव्हरपर्यंत संघर्ष करावा लागला. श्रीलंकेने 18.5 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे या मोहिमेतील आपला एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. तर हाँगकाँग या स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरली. मात्र हाँगकाँगने चाहत्यांची मनं जिंकली.

हाँगकाँगने श्रीलंकेला झुंजवलं

कुसल मेंडीस आणि कामिल मिशारा हे दोघे आऊट झाल्याने श्रीलंकेचा स्कोअर 9.3 ओव्हरमध्ये 2 आऊट 62 असा झाला. कुसलने 11 आणि कामिलने 19 धावा केल्या. त्यानंतर पाथुम निसांका आणि कुसल परेरा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर हाँगकाँगला ही जोडी फोडण्यात यश आलं. हाँगकाँगने श्रीलंकेला 119 धावांवर तिसरा झटका दिला. पाथुमने 44 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 2 सिक्स आणि 6 फोर लगावले. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर कुसल परेरा आऊट झाला. श्रीलंकेने आणखी 3 धावा जोडल्या आणि आणखी एक विकेट गमावली. कॅप्टन चरिथ असलंका 2 रन्स करुन आऊट झाला.

हाँगकाँगने झटपट 3 झटके देत सामन्यात कमबॅक केलं आणि श्रीलंका बॅकफुटवर ढकललं. चरिथनंतर 127 धावांवर हाँगकाँगने श्रीलंकेला सहावा झटका दिला. कामिंदू मेंडीस 5 धावांवर आऊट झाला. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती 17.1 ओव्हरमध्ये 6 आऊट 127 रन्स अशी झाली. आता श्रीलंकेला 17 बॉलमध्ये 33 धावांची गरज होती. तर हाँगकाँगला 4 विकेट्स हव्या होत्या. मात्र दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा ही जोडी टिकून राहिली. या दोघांनी 1-2 धावा जोडल्या. तसेच संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी करत श्रीलंकेला सलग दुसरा विजय मिळवून दिला.

श्रीलंकेने सामना जिंकला, हाँगकाँगने कामगिरीने मनं जिंकली

वानिंदूने 9 बॉलमध्ये नॉट आऊट 20 रन्स केल्या. वानिंदूने निर्णायक क्षणी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर दासूनने नाबाद 6 धावा केल्या. तर हाँगकाँगसाठी यासिम मुर्तझा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर आयुष शुक्ला, एहसान खान आणि एझाज खान या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.