
एसीसी मेन्स आशिया कप एमर्जिंग रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने आज 21 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहेत. दुसर्या सामन्यात श्रीलंका ए विरुद्ध पाकिस्तान ए आमनेसामने असणार आहेत. तर पहिल्या सामन्यात भारत ए विरुद्ध बांगलादेश ए यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस आहे.भारत ए विरुद्ध बांगलादेश ए यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
उभयसंघातील उपांत्य फेरीतील सामन्याचं आयोजन हे दोहा येथील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. भारताने साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ओमानला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली. टीम इंडिया बी ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचली आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने ए ग्रुपमधून सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. बांगलादेशने 17 नोव्हेंबरला अफगाणिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवला. बांगलादेश यासह सेमी फायनलमध्ये पोहचली. मात्र बांगलादेशला साखळी फेरीतील त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. श्रीलंकेने बांगलादेशवर 6 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
टीम इंडियात एकसेएक फलंदाज आहेत. त्यामुळे टीम इंडियात 200 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. मात्र भारतीय गोलंदाजांना बांगलादेशला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे. भारताकडे अनेक गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाज बांगलादेशला 20 ओव्हरआधी रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
बांगलादेश ए प्लेइंग ईलेव्हन : हबीबुर रहमान सोहन, जिशान आलम, झवाद अब्रार, अकबर अली (कॅप्टन आणि विकेटकीपर), महिदुल इस्लाम अंकन, यासिर अली, एसएम मेहेरोब, अबू हैदर रोनी, रकीबुल हसन, अब्दुल गफ्फार सकलेन आणि रिपन मंडोल.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नमन धीर, नेहल वढेरा, हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, रमणदीप सिंग, विजयकुमार वैशाख, गुरजपनीत सिंग आणि सुयश शर्मा.