AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games ind vs nep : भारताचा नेपाळवर 23 धावांनी विजय, जयस्वालची शतकी खेळी

IND vs NEP Asian Game 2023 : नेपाळ संघाला  20 ओव्हर्समध्ये 179-9 धावाच करता आल्या.  या विजयासह ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. 

Asian Games ind vs nep : भारताचा नेपाळवर 23 धावांनी विजय, जयस्वालची शतकी खेळी
| Updated on: Oct 03, 2023 | 11:48 AM
Share

मुंबई : एशियन गेम्समधील (Asian Game 2023) भारत आणि नेपाळ (IND vs NEP) यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. नेपाळने पहिले दोन सामने जिंकत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली होती. भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये नेपाळ संघाचा 23 धावांनी पराभव झाला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना नेपाळसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने धडाकेबाज 100 धावांची शतकी खेळी केली. नेपाळ संघाला  20 ओव्हर्समध्ये 179-9 धावाच करता आल्या.  या विजयासह ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे.

सामन्याचा आढावा-

भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा सलामीवीर जयस्वाल याने पहिल्या ओव्हरपासूनच आक्रमक रूप धारण केलं होतं. कॅप्टन ऋतुराज त्याला दुसऱ्या बाजूने साथ देत होता.  दोघांनी 103 धावांची सलामी दिली. ऋतुराज 25 धावांवर बाद झाला, त्यानंतर तिलक वर्मा 2 धावा आणि  जितेंद्र शर्मा 5 धावा करून माघारी परतले.

यशस्वीने आपलं शतक पूर्ण करत कमी वयात टी-20 फॉरमॅटमध्ये शतक करण्याचा विक्रम आपल्या नााववर केला. अवघ्या 48 चेंडूत त्याने 100 धावा केल्या यामध्ये 8 चौकार आणि 7 षटकार मारले. जयस्वाल शतक करून बाद झाल्यावर रिंकू सिंग याने झलक दाखवली. पठ्ठ्याने 15 चेंडूत 37 धावा केल्या यामध्ये त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले.

भारताने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेपाळ संघाची ठिकठाक झाली होती. 29 धावांवर आवेश खान याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. कुशल भुर्तेल आणि कुशल मल्ला यांनी भागीदारी केली होती. रविश्रीनिवासन साई किशोरने हा जोडी फोडत दुसरा धक्का दिला.

नेपाळ संघाच्या दीपेंद्र सिंग आयरी 32 धावा आणि संदीप जोरा 29 धावा यांनी विजयाच्या आशा जिंवत केल्या होत्या. मात्र आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद करत बॅकफूटला ढकललं.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड (C), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा (W), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (W), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (C), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.