AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli च्या निशाण्यावर दुसऱ्या कसोटीत 5 रेकॉर्ड्स, कोहली ॲडलेडमध्ये लगावणार विक्रमाचा पंच!

Virat Kohli AUS vs IND 2nd Test: विराट कोहलीला धावांसाठी गेली अनेक महिने संघर्ष करावा लागला. विराटने 16 महिन्यानंतर पर्थमध्ये शतक झळकावत आता कमबॅक केलंय. विराटला दुसऱ्या कसोटी तब्बल 5 विक्रम करण्याची संधी आहे.

Virat Kohli च्या निशाण्यावर दुसऱ्या कसोटीत  5 रेकॉर्ड्स, कोहली ॲडलेडमध्ये लगावणार विक्रमाचा पंच!
virat kohli aus vs ind centuryImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 03, 2024 | 1:10 AM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिली कसोटी ॲडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. ही मॅच डे-नाईट असणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पर्थमधील पहिल्या कसोटीत शतक ठोकत कमबॅक केलं. विराटने 16 महिन्यांनंतर शतक झळकावलं. त्यामुळे आता विराटकडून दुसऱ्या सामन्यातही अशीच खेळी अपेक्षित असणार आहे. विराटला ॲडलेडमध्ये 5 विक्रम करण्याची संधी आहे.

विराट, ॲडलेड आणि 5 विक्रम

विराटने आतापर्यंत 4 पिंक बॉल टेस्ट मॅचमधील 6 इनिंगमध्ये 46.16 च्या एव्हरेजने 277 रन्स केल्या आहेत. त्यामुळे विराटला पिंक बॉल टेस्टमध्ये 300 धावांसाठी अवघ्या 23 धावांची गरज आहे. विराट 23 धावा करताच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. तसेच विराटने 102 धावा केल्यास तर तो ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा पहिला परदेशी खेळाडू ठरेल. विराट सध्या या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

इतकंच नाही, तर विराटकडे ॲडलेडमध्ये 1 हजार धावा करण्याचीही संधी आहे. विराट 1 हजार धावांपासून फक्त 43 धावा दूर आहे. तसेच विराटला आंतरराष्ट्रीय धावांबाबत रिकी पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विश्व विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर कुमार संगकारा दुसऱ्या, रिकी पॉन्टिंग तिसऱ्या आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर, सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.

नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत.
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!
भाजप प्रवेशाच्या दुपट्ट्यांनी तयार तर काँग्रेसकडे उपरण्याचा दुष्काळ!.