Aus vs Ind 4th Test | कांगारुंवर 36 वर्षांनंतर टांगती तलवार, नामुष्की टाळण्यासाठी एकच संधी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात ब्रिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना खेळण्यात येत आहे.

Aus vs Ind 4th Test | कांगारुंवर 36 वर्षांनंतर टांगती तलवार, नामुष्की टाळण्यासाठी एकच संधी
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 5:41 PM

ब्रिस्बेन : बॉर्डर गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा कसोटी सामना (Aus vs Ind 4th Test) ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलियाने 54 धावांची आघाडी घेतली आहे. हा चौथा सामना आतापर्यंत बरोबरीत आहे. दोन्ही संघांकडे एक डावात फलंदाजीची संधी आहे. ऑस्ट्रेलिया या सामन्यातील तिसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाला विजयासाठी तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियावर आणखी एकाबाबतीत टांगती तलवार आहे. ही नामुष्की टाळण्याचं आव्हानही ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे. (aus vs ind 4 test australia still 36 years constant scored 400 in each innings in home test series)

नक्की प्रकरण काय?

प्रकरण असंय की ऑस्ट्रेलियाला आपल्याला भूमित 36 वर्षानंतर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत 4oo धावा करण्यास अपयशी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या 36 वर्षात आपल्या भूमित प्रत्येक कसोटी मालिकेत किमान एकदा 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र कांगारुंना टीम इंडियाविरोधातील या बॉर्डर गावसकर मालिकेत आतापर्यंत 400 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. यामुळे ऑस्ट्रेलियाला 36 वर्षांनंतर ही नामुष्की टाळण्याची एकच संधी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ही नामुष्की टाळते की अपयशी ठरते, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलियाला मायदेशात 36 वर्षांपूर्वी अशी नामुष्की ओढावली होती. ऑस्ट्रेलियाने 1985-86 मध्ये 6 कसोटी सामन्यांच्या देशांतर्गत मालिकेत लाजीरवाणी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत एका डावात 396 धावा केल्या होत्या. तेव्हा पासून देशांतर्गत खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने किमान एकदा तरी 400 पेक्षा अधिक धावा केल्या. दरम्यान या मालितकेतील अजून ऑस्ट्रेलियाला अशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया या मालिकेतील शेवटच्या सामन्यातील शेवटच्या डावात 400 पेक्षा अधिक धावा करते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

चौथ्या सामन्यातील आतापर्यंतची स्थिती

15 जानेवारीपासून चौथ्या कसोटीला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी निवडली. कांगारुंनी पहिल्या डावात 369 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत 33 धावा कमी केल्या. म्हणजेच टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसखेर बिनबाद 21 धावा केल्यात. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | बोलिंगने कमाल, बॅटिंगने धमाल, शार्दुल-सुंदरची रेकॉर्ड कामगिरी

Aus vs Ind 4th Test | शार्दूल-वॉशिंग्टनची शानदार खेळी, ब्रिस्बेनवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

(aus vs ind 4 test australia still 36 years constant scored 400 in each innings in home test series)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.