AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA: अरे हे काय? LIVE मॅचमध्ये लाबुशेनचा सिगारेटचा इशारा, मागितलं लायटर, VIDEO

AUS vs SA: लाबुशेनने सिगारेटचा इशारा करुन लायटर मागितलं, ते मिळाल्यानंतर लायटर पेटवून त्याने....

AUS vs SA: अरे हे काय? LIVE मॅचमध्ये लाबुशेनचा सिगारेटचा इशारा, मागितलं लायटर, VIDEO
marnus labuschagneImage Credit source: VideoGrab
| Updated on: Jan 04, 2023 | 11:38 AM
Share

सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सिडनीत तिसरा कसोटी सामना सुरु आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. त्यांची सुरुवात चांगली झाली. पण फलंदाजी सुरु असताना, मार्नस लाबुशेनने जी कृती केली, त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. लाबुशेनने फलंदाजी सुरु असताना, सिगारेटचा इशारा केला. पॅव्हेलयिनमध्ये बसलेल्या सहकारी खेळाडूंकडे पाहून लाबुशेनने हा इशारा केला. त्याने लायटरची सुद्धा मागणी केली. जेव्हा त्याला ते मिळालं, तेव्हा त्याने मैदानातच आग पेटवली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लाइव्ह मॅच सुरु असताना, त्याने सिगारेट आणि लायटरचा इशारा का केला?

दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी डोकेदुखी ठरु शकतो

मार्नस लाबुशेन सिडनी टेस्टमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. त्याने दमदार फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. फिफ्टी प्लस धावा सुद्धा त्याने केल्या. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, ते पाहून दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी तो मोठी डोकेदुखी ठरु शकतो.

टीमकडे लायटर मागितलं

सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी खराब प्रकाशाने मॅचमध्ये अडचण आणली. खराब प्रकाशामुळे मॅच थांबण्याआधी मैदानावर जे दृश्य दिसलं, ते हैराण करुन सोडणारं होतं. लाबुशेनने पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या आपल्या टीमकडे लायटर मागितलं. जेव्हा त्यांना कळलं नाही, तेव्हा त्याने सिगारेट पिण्याचा इशारा करुन समजावलं. लायटर मिळाल्यानंतर लाबुशेनने ते लायटर पेटवलं. लायटर मागितलं, पण सिगारेट पिण्यासाठी नाही, तर….

लाबुशेनने लायटर मागितलं, ते सिगारेट पेटवण्यासाठी मागितलं, असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. कारण लाइव्ह मॅचमध्ये तो असं करु शकत नाही. मग लाबुशेनने लायटर का मागितलं? लाबुशेनच्या हेल्टमेटमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. तो दुरुस्त करण्यासाठी त्याने लायटर मागितलं होतं. लायटर मिळाल्यानंतर ते पेटवून त्याने हेल्मेट दुरुस्त केलं.

आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.