AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs SA Odi Series : टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?

Australia vs South Africa 1st ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-2 ने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता दोन्ही संघात मंगळवारपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

AUS vs SA Odi Series : टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?
Temba Bavuma and Mitchell Marsh AUS vs SA Odi SeriesImage Credit source: Icc
| Updated on: Aug 19, 2025 | 12:22 AM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20i मालिकेनंतर 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20i मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता कांगारुंचं एकदिवसीय मालिका जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. तर दक्षिण आफ्रिका ही मालिका जिंकून टी 20i सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या एकदिवसीय मालिकेत उभयसंघात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कधी?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना मंगळवारी 19 ऑगस्टला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कॅझलीज स्टेडियम, केर्न्स येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवायला मिळेल.

ऑस्ट्रेलियासमोर 11 वर्षांची प्रतिक्षा संपवणार?

ऑस्ट्रेलियाला गेल्या 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची एकदिवसीय मालिका 2014 साली 4-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर उभयसंघात एकूण 4 एकदिवसीय मालिका खेळवण्यात आल्या. दक्षिण आफ्रिका चारही वेळा सरस ठरली.

दक्षिण आफ्रिका कांगारुंवर वरचढ

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 110 सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या 110 पैकी सर्वाधिक 55 सामने जिंकले आहेत. तर कांगारुंनी 51 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. उभयसंघातील 1 सामन्याचा निकाल लागला नाही. तर 3 सामने टाय झाले. मात्र आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकाच ऑस्ट्रेलियावर वरचढ असल्याचं सिद्ध होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.