AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीआधीच फिरकीपटू एडम झाम्पा वैतागला, म्हणाला…

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झाम्पाने नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीआधीच फिरकीपटू एडम झाम्पा वैतागला, म्हणाला...
| Updated on: Mar 03, 2025 | 3:40 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना 4 मार्चला होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास विचित्र पद्धतीने झाला. पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलियाने 4 गुणांसह उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं. पण उपांत्य फेरीत दुबई की लाहोरला खेळायचं हे निश्चित होत नव्हतं. त्यामुळे तिसरा सामना होतात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांनी दुबईला कूच केली. आता कोणता संघ दुबईत राहणार आणि कोणता लाहोरला जाणार हे भारत न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून होतं. पण भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाचा लाहोर रिटर्न प्रवास वाचला. आता दक्षिण अफ्रिकेला न्यूझीलंडसोबत लाहोरला परतावं लागणार आहे.

दुसरीकडे, धावपळीच्या वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झाम्पा याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्पष्टच सांगायचं तर पाकिस्तानात काही सामने खेळताना आमचं वेळापत्रक धावपळीचं होतं. या शहरातून त्या शहरात जावं लागलं होतं. पण दुबईत येऊन बरं वाटलं. आयसीसी अकादमीत चांगली सुविधा आहे. काही बदल करणं आवश्यक आहे. पण खेळाडूंना सर्वकाही ठीक वाटत आहे.’, असं एडम झाम्पा म्हणाला.

दुबईची खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी आहे. वरुण चक्रवर्तीने हे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून एडम झाम्पा हे प्रमुख हत्यार असणार आहे. यावर बोलताना एडम झाम्पाने सांगितलं की, ‘खरं सांगायचं तरी मी माझी सर्वोत्तम कामगिरी करत आहे असं वाटत नाही. माझ्याकडून चांगली कामगिरी होत नाही हे मला कळतं. पण मोठ्या विकेट घेण्याची क्षमता आहे हे मी नाकारू शकत नाही. त्यामुळे मी माझं सर्वोत्तम देण्यासाठी प्रयत्नशील असेल.’ रोहित शर्माने या स्पर्धेत एकूण 4 विकेट घेतल्या आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.