Australia vs Pakistan: 24 वर्षानंतर पहिल्यांदाच कांगारू जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर, तिन्ही प्रकारच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर आता पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया 24 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Australia vs Pakistan: 24 वर्षानंतर पहिल्यांदाच कांगारू जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर, तिन्ही प्रकारच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (संग्रहीत फोटो)
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:18 PM

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघ मागील कित्येक वर्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. देशातील दहशतवादाच्या मुद्द्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला हाल सोसावे लागतात. 2009 साली लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय संघानी पाकिस्तानचा दौरा करणं सोडून दिलं. पण मागील काही वर्षांमध्ये यात बदल होत असून काही संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. यान्वयेच तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. 2022 च्या मार्चमध्ये हा दौरा होणार असून नुकतंच याचं वेळापत्रकही समोर आलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) ट्विटरवरुन दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली आहे. या दौऱ्यामध्ये प्रत्येकी 3 कसोटी आणि एकदिवसीय सामने असून एक टी20 सामना खेळवला जाणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील महिन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघानी त्यांचे पाकिस्तानचे दौरे अचानक रद्द केले होते. न्यूझीलंडचा संघ तर पाकमध्ये पोहचून सामन्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणावरुन माघारी परतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही नक्की दौऱ्यावर येईल का? हे अजून सांगता येणार नाही, पण तूर्तास वेळापत्रक तरी समोर आले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान वेळापत्रक

कसोटी सामने

3 ते 7 मार्च – पहिला कसोटी सामना, कराची 12 ते 16 मार्च – दुसरा कसोटी सामना, रावळपिंडी 21 ते 25 मार्च – तिसरा कसोटी सामना, लाहोर

एकदिवसीय सामने

29 मार्च – पहिला एकदिवसीय सामना, लाहोर 31 मार्च – दुसरा एकदिवसीय सामना, लाहोर 2 एप्रिल– तिसरा एकदिवसीय सामना, लाहोर

टी20 सामना

5 एप्रिल– एकमेव टी20 सामना, लाहोर

इतर बातम्या

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Australia Cricket team will go to Pakistan tour after 24 years in march 2022)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.