बांगलादेशविरुद्धचा पराभव जिव्हारी! ऑस्ट्रेलियाकडून ऑपरेशन सुरू, या खेळाडूला काढलं बाहेर

बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवलं. पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची नाचक्की झाली. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यापू्र्वी संघात ऑपरेशन सुरू झालं आहे.

बांगलादेशविरुद्धचा पराभव जिव्हारी! ऑस्ट्रेलियाकडून ऑपरेशन सुरू, या खेळाडूला काढलं बाहेर
बांगलादेशविरुद्धचा पराभव जिव्हारी! ऑस्ट्रेलियाकडून ऑपरेशन सुरू, या खेळाडूला काढलं बाहेर
Image Credit source: Cricket Australia/ X
| Updated on: Aug 18, 2026 | 5:00 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला दुबळ्या बांगलादेशने दणका दिला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात 9 विकेट पराभवाची धूळ चारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं मालिका विजयाचं गणित चुकलं. इतकंच काय तर आता मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे. कारण दुसरा कसोटी सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर बांगलादेशच्या खात्यात ही मालिका जाईल. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला काहीही करून जिंकणं भाग आहे. यासाठी पहिल्या कसोटी सामन्यात काय चुका झाल्या त्या दुरूस्त करण्याचं काम सुरू झालं आहे. दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यीय स्कॉडमध्ये मोठा बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने ओपनर वेदराल्डची विकेट घेतली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खराब फॉर्म असलेल्या ओपनर वेदराल्ड याला संघातून बाहेर काढलं आहे. वेदराल्डने पहिल्या कसोटी सामन्यात निराश केलं होतं. दुसऱ्या डावात तर खातंही खोलता आलं नाही. वेदरॉल्डने पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात 0 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या जागी संघात मॅट रेनशॉ याला संधी दिली गेली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ट्रेव्हिस हेडसोबत ओपनिंग करेल. तर 13 सदस्यीय संघात जोश इंग्लिस हा अतिरिक्त फलंदाज असणार आहे.

मॅट रेनशॉने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2016 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने 14 कसोटी सामन्यात 29.31 च्या सरासरीने 645 धावा केल्या आहेत. यात एक शतक ठोकलं आहे मॅट रेनशॉ शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2023 मध्ये खेळला होता. तेव्हा पहिल्या डावात संघाचा भाग नव्हता. पण डेव्हिड वॉर्नरला डोक्याला लागल्याने कन्कशन सब्सिट्युट म्हणून संघात स्थान मिळालं होतं. तेव्हा त्याने 2 दावा केल्या होत्या. त्यानंतर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ संघातून बाहेर होता. आता बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी दिली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हॅझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लीस, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us