Aus vs Ind 4th Test, 3rd Day : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा, तिसऱ्या दिवसखेर 54 धावांची आघाडी

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या  दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेस्तोर बिनबाद 21 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची […]

Aus vs Ind 4th Test, 3rd Day  : ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद 21 धावा, तिसऱ्या दिवसखेर  54 धावांची आघाडी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 3:33 PM

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) तिसऱ्या  दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 336 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेस्तोर बिनबाद 21 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाकडे 54 धावांची आघाडी आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 20 मार्कस हॅरिस 1 धावांवर नाबाद आहे. (australia vs india 2020 21 4th test day 2 live cricket score updates online in marathi at the gabba) स्कोअरकार्ड

त्याआधी टीम इंडियाचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी अनुक्रमे 67 आणि 62 धावांची झुंजार खेळी केली. तसेच सलामीवीर रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली.  ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर  मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू नॅथन लायनने 1 विकेट घेतली.

दुसऱ्या दिवशी पावसामुळे काही ओव्हर्सा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळाला नेहमीपेक्षा लवकर सुरुवात करण्यात आली. टीम इंडियाने 62-2 या धावसंख्येवरुन फलंदाजीला सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खेळत होते. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा 25 धावांवर आऊट झाला. यानंतर मंयकसह रहाणेने चौथ्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या.  कर्णधार रहाणेला दोन जीवनदान मिळाले. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. रहाणेही 37 धावा करुन माघारी परतला. रहाणेला चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुंपातर करण्यास यश आले नाही.

रहाणेनंतर पंत मैदानात आला. पंत आणि मयंकने स्कोअरकार्ड हलता ठेवला. मात्र मयंक चांगली खेळी करत होता. अनेक सामन्यांनंतर त्याला सूर गवसला. पण मयंकही 38 धावा करुन बाद झाला. मयंक बाद झाल्यानंतर  वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला.

पंतने सुंदरसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयोग फार यशस्वी ठरला नाही. पंत चांगली खेळी करत होता. पण पंत फटकेबाजी करण्याच्या नादात 23 धावांवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. टीम इंडियाची 6 बाद  186 अशी स्थिती झाली.

मैदानात वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर ही नवखी जोडी मैदानात होती.या दोघांनी खिंड लढवली. या दोघांनी कांगारुंना चांगलचं तंगवलं.  दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी अर्धशतक लगावलं. या दोघांच्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 336 अशी मजल मारता आली. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी अनुक्रमे 67 आणि 62 धावांची झुंजार खेळी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला 50 धावांपेक्षा कमी धावांची आघाडी मिळाली.

दरम्यान उद्याचा सामन्याचा चौथा दिवस हा निर्णायक असणार आहे. टीम इंडियाचे गोलंदाज दुसऱ्या डावात कशाप्रकारे गोलंदाजी करतात, याकडे भारतीय समर्थकांचं लक्ष असणार आहे.

तिसऱ्या दिवसखेर ऑस्ट्रेलिया

21-0 (6 Overs)

मार्कस हॅरिस 1*

डेव्हिड वॉर्नर 20*

(australia vs india 2020 21 4th test day 2 live cricket score updates online in marathi at the gabba)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.